आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी माथा टेकण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वेने नागपूर – मिरज , नागपूर – पंढरपूर व अमरावती – पंढररपूरदरम्यान 25 ते 28 जून रोजी दोन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या अप व डाउन अशा सहा फेऱ्या होणार असून, त्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकर भाविकांची सोय होणार आहे.

याशिवाय खामगाव येथूनही एक विशेष रेल्वे गाडी पंढरपूरला सोडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग प्रबंधक कार्यालयातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, 01205 नागपूर – मिरज ही विशेष गाड़ी रविवार, 25 जून व बुधवार, 28 जून रोजी नागपूर स्थानकावरून सकाळी 8.50 वाजता रवाना होणार आहे.

ही गाडी त्याच दिवशी दुपारी 13.27 वाजता अकोला स्थानकावर येऊन 13.30 वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पंढरपूर स्थानकावर पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात 01206 मिरज – नागपुर ही विशेष गाडी सोमवार, 26 जून व गुरुवार, 29 जून रोजी मिरज स्थानकावरून दुपारी 12.55 वाजता रवाना होऊन त्याच दिवशी दुपारी 15.55 वाजता पंढरपूर स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी सायंकाळी 17.00 वाजता पंढरपूर स्थानकावरून प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी सकाळी 7.10 वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

नागपूर – पंढरपूर 26 व 29 ला गाडी क्र. 01207 ही विशेष गाडी नागपूर येथून 26 व 29 जून रोजी सकाळी 8.50 वाजता रवाना होऊन त्याच दिवशी अकोला स्थानकावर 13.37 वाजता येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 8.00 वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात 01208 ही विशेष गाडी पंढरपूर येथून 27 व 30 जून रोजी सायंकाळी 17.00 वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 7.10 वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

अमरावती – नागपूर 25 व 28 ला गाडी क्र. 01119 ही विशेष गाडी नवी अमरावती स्थानकावरून 25 व अमरावती – नागपूर 25 व 28 ला – गाड़ी क्र. 01119 ही विशेष गाडी नवी अमरावती स्थानकावरून 25 व 28 जून रोजी दुपारी 14.40 वाजता रवाना होऊन त्याच दिवशी दुपारी 16.20. वाजता अकोला स्थानकावर येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 09.10 वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात 01120 ही विशेष गाडी 26 व 29 जून रोजी पंढरपूर स्थानकावर सायंकाळी 19.30 वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 10.07 वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

नागपूर – मिरज आषाढी एक्सप्रेसचे हे आहेत थांबे :-

अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जाठरगाव, ढालगाव, कवठेमहांकाळ व सुलगरे या स्थानकांवर थांबा राहणार आहे.

नागपूर – पंढरपूर – नागपूर आषाढी विशेष एक्सप्रेसचे हे आहेत थांबे :-

नागपूर – पंढरपूर – नागपूर आषाढी विशेष गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड व कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबा राहील. सर्व गाड्यांचे आरक्षण 19 जूनपासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे नागपूर विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *