Indian Navy : 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलात भरतीची मोठी संधी, तब्बल 910 जागा, पहा ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंक..
भारतीय नौदल नागरी प्रवेश परीक्षा 2023 साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया काल 18 डिसेंबर 2023 पासून सुरू झाली आहे. इंडियन नेव्हीच्या CET 2023 साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत..
इंडियन नेव्ही CET 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. CET 2023 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अर्जाची पात्रता, निवड प्रक्रिया आणि अर्जाच्या अटींबद्दल डिटेल्समध्ये संपूर्ण भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे जे PDF स्वरूपात खाली दिले आहे.
भारतीय नेव्ही CET रजिस्ट्रेशन तारखा :-
ऑनलाइन नोंदणीची सुरुवात तारीख – 18-12-2023
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख – 31-12-2023
रिक्त जागा डिटेल्स :-
भारतीय नौदल नागरी प्रवेश परीक्षा 2023 द्वारे एकूण 910 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
वयोमर्यादा आणि जागा :-
चार्जमन – 42 जागा – 18-25 वर्षे
सिनियर ड्रॉफ्ट्समन 258 जागा – 18-27 वर्षे
ट्रेड्समन मेट – 610 जागा – 18-25 वर्षे
अर्ज फी – भारतीय नौदल CET 2023 साठी, सामान्य आणि OBC प्रवर्गांसाठी 295 रुपये जमा करावे लागतील, तर SC, ST आणि अपंग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही..
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी :- नोटिफिकेशन पहा
भारतीय नौदल CET 2023 चा परीक्षेचे स्वरूप कसे असणार ?
इंडियन नेव्ही CET 2023 मध्ये निवडलेल्या सर्व उमेदवारांना ऑनलाइन लेखी परीक्षेत भाग घ्यावा लागेल. या परीक्षेतील MCQ प्रकारचे प्रश्न हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असणार आहे.
तुम्ही भारतीय नौदल CET 2023 साठी या सोप्या स्टेप्समध्ये अर्ज करू शकता..
– भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट www.joinindiannavy.gov.in वर जा..
– होमपेजवर दिसणार्या ‘Join Navy’ या लिंकवर क्लिक करा.
– आता ‘ways to join’ आणि नंतर ‘Civilians’ ऑप्शनवर क्लिक करा.
– आता CET लिंक INICET 2023 वर क्लिक करून स्वतःचे रजिस्ट्रेशन करा.
– लॉगिन करा आणि अर्ज भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा..
– अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील गरजांसाठी अर्जाची प्रिंटआउट स्वतःजवळ ठेवा..