Take a fresh look at your lifestyle.

ग्रामपंचायतीत पतीचा हस्तक्षेप, सरपंच पत्नीने गमावले पद ! असा झाला अविश्वास ठराव पारित..

0

अखेर गाजगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाविरोधात अविश्वास ठराव पारित करण्यात आला. नऊ विरोधात एक अशा मताने अविश्वास ठराव पारित करण्यात आला असून एक सदस्य अनुपस्थित राहिला. तत्पूर्वी, अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात येण्यापासून मज्जाव करणाऱ्या विरोधकांना हटविण्यासाठी शिल्लेगाव पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. गोंधळ करणाऱ्या आठ जणांविरोधात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सोमवारी दुपारी दोन वाजेदरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात गाजगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार सतीश सोनी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. तलाठी तोरंबे, ग्रामविकास अधिकारी जनार्दन शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती.

अविश्वास ठराव सभेला भागुबाई पाटेकर, रोहिदास शिखरे गीता लिंगायत, गोकुळ डोंगरे, जिजाबाई काळवणे, वर्षा काळवणे, कडूबाई काळे, सुभद्राबाई कांबळे, आसाराम सोनवणे तसेच सरपंच आशाबाई धुमाळ यांची उपस्थिती होती. कैलास कांबळे हे सदस्य यावेळी अनुपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत सरपंचावर अविश्वास ठराव दाखल करण्याची कारणे देताना सदस्य कडूबाई हिवाळे यांनी ग्रामपंचायतच्या कारभारात सरपंचाच्या पतीचा हस्तक्षेप आहे, वृक्षतोडीकडे ते लक्ष देत नाही घरकुल मंजूर करण्यासाठी सरपंच पतीकडून पैशाची मागणी केली जाते, तसेच सरपंच मनमानी कारभार करतात, सरपंच सदस्यांना विश्वासात घेत नाही, ग्रामपंचायतीच्या धनादेशावर सरपंचपती स्वाक्षरी करतात, त्यानंतर आसाराम सोनवणे, रोहिदास शिखरे, जिजाबाई काळवणे यांनीही महिला सरपंच तसेच त्यांच्या पतीच्या हस्तक्षेपाचा पाढाच वाचला.

उत्तर देताना सरपंच आशाबाई धुमाळ यांनी वरील सर्व आरोप फेटाळले. त्यानंतर अविश्वास ठराव पारित करण्यासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात उपस्थित सरपंच, उपसरपंच यांच्यासह दहा सदस्यांपैकी सरपंचाच्या अविश्वास ठरावाविरोधात एक विरुद्ध नऊ असे मतदान झाले. त्यावरून तहसीलदार सतीश सोनी यांनी अविश्वास ठराव पारित झाल्याचे जाहीर केले.

सदस्यांना उपस्थित राहण्यास विरोध

दरम्यान, अविश्वास ठराव सभेला उपस्थित राहण्यासाठी सदस्य ग्रामपंचायत कार्यालय परिसरात हजर होताच मोठा गोंधळ निर्माण झाला. महिलांसह काही पुरुषांनी उपस्थित सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यास मोठा विरोध केला. परिस्थिती गंभीर होत असल्याने उपस्थित पोलिसांनी विरोध करणाऱ्यांवर लाठीचार्ज करून त्यांना हटविले.

सदस्य पोलीस बंदोबस्तात घरी 

गाजगाव येथे अविश्वास ठरावानिमित्त गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. वादही झाला. पोलिसांनी लाठी मारही केला. या सर्व पार्श्वभूमीवर सभा संपल्यानंतर सदस्यांना पोलीस बंदोबस्तात वाहनातून घरी सोडण्यात आले. विशेष म्हणजे आजच्यासारखा लासूर स्टेशन परिसरात यापूर्वी असा गोंधळ कधीही झालेला बघायला मिळाला नसल्याची भावना ग्रामस्थांसह सदस्यांत दिसून येत होती.

Leave A Reply

Your email address will not be published.