Take a fresh look at your lifestyle.

MGNREGA : सिंचन विहीर योजनेच्या कामाला गती ! मिळतंय 4 लाखांचे अर्थसहाय्य, ‘या’ ॲपवर असा करा ऑनलाईन अर्ज..

शेतकऱ्यांना पिकांच्या सिंचनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. शासन विविध योजना राबवून शेतकऱ्यांना ‘सिंचनाची साधने व सुविधा’ यावर अनुदान देत आहे. या संदर्भात, सरकार आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहिरी बांधण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाअंतर्गत नवी विहीर बांधण्यासाठी तब्बल 4 लाखांचे अनुदान देणार असून आता या योजनेला गती मिळाली आहे. 

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनुसार, महाराष्ट्रात आणखी 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदल्या जाणार असून प्रत्येक ग्रामपंचायतीत तब्बल १५ विहिरी बांधण्यात येणार आहे. यात सर्वात आनंदाची बातमी म्हणजे अंतराची अट रद्द झाली आहे.

शेतात विहीर बांधल्याने शेतकऱ्यांना सिंचनाच्या कामात सोय होणार आहे. ते कधीही पिकांना सिंचन करण्यास सक्षम असतील. विहिरीतूनही पावसाचे पाणी साठवता येते. अशा परिस्थितीत शासनाकडून विहीर बांधकामावर देण्यात येणाऱ्या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोहयो विभागामार्फत करण्यात आले आहे.

आज ‘शेतीशिवार’च्या माध्यमातून विहीर बांधण्यासाठी शासनाकडून मिळालेल्या अनुदानाची माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये विहीर बांधण्यासाठी किती अनुदान मिळेल ? विहीर बांधण्यासाठी तुम्ही अनुदानासाठी अर्ज कसा करू शकता ? त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील आदी माहिती जाणून घेणार आहोत..

पात्रता, कागदपत्रे, विहीर कुठे खोदावी कुठे खोदु नये ? याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही :- इथे क्लिक करा

त्यानंतर तुम्ही पुन्हा बॅक येऊन सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन अर्ज हा मनरेगाच्या मोबाईल अँप वर करायचा आहे, तसेच ऑनलाईन अर्ज केल्यानंतर एक PDF फॉर्म खाली दिला आहे तो डाउनलोड करून त्याची सर्व माहिती भरून ग्रामसेवकांकडे जमा करावा.

नमुना अर्ज PDF फॉर्म डाउनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा

मनरेगा अंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा कराल ?

सर्वप्रथम, तुम्ही मोबाईलमध्ये मनरेगाचे राज्य शासनाचे MAHA-EGS Horticulture/Well अँप हे मोबाईल अँप डाउनलोड करा. लिंक – MAHA-EGS

त्यानंतर तुम्हाला लाभार्थी लॉगिन व विभागाचे लॉगिन हे पेज दिसेल, तुम्ही लाभार्थी लॉगिन वर क्लिक करा व त्यानंतर विहीर अर्जावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला विहीर अर्जाचा फॉर्म समोर ओपन होईल तो खाली दिला आहे, त्यामध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. यामध्ये तुम्हाला जॉबकार्ड सहित शेतजमिनीची कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करायची आहे, त्यामुळे कागदपत्रे गॅलरीत ठेवा..

 

ही सर्व माहिती भरल्यानंतर  तुम्ही तुमच्या अर्जाची स्थितीही पाहू शकता.. तुमचा अर्ज हा ग्रामसेवकांकडून BDO कडे मंजुरीसाठी जातो त्यानंर्र तुमच्या शेतजमिनीची माहिती घेण्यासाठी अधिकारी स्वतः येऊन हा अर्ज मंजूर होतो.