नागरिकांना अनुदानित अन्नधान्य मिळविण्याकरता शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड हे अंत्यत महत्वाचे दस्तऐवज आहे. महाराष्ट्रात, रेशन कार्ड राज्य सरकारद्वारे जारी केले जाते आणि राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाद्वारे व्यवस्थापित केले जाते. महाराष्ट्र रेशन कार्डसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला महाराष्ट्र राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा करावा लागतो. महाराष्ट्र रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत..
महाराष्ट्र रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ?
तुम्ही देखील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुम्हाला नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करा..
महाराष्ट्र राज्याच्या नवीन शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र रेशन कार्डच्या अधिकृत वेबसाइट mahafood.gov.in ला भेट द्या.
वेबसाइटला आल्यानंतर, तुम्हाला वेबसाइटच्या होम पेजवर मेनू कार्डमध्ये दिलेल्या डाउनलोड लिंकवर क्लिक करावे लागेल. महाराष्ट्र शिधापत्रिका अर्ज Download वर क्लिक करा.
डाउनलोड लिंकवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला नवीन पेजवर रिडायरेक्ट केले जाईल. या नवीन पानावर आल्यानंतर, तुम्हाला नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज
Form 1 : Application for New Ration Card अंतर्गत दिलेल्या लिंकवर क्लिक करून नवीन रेशन कार्डसाठी अर्ज डाउनलोड करावा लागेल.
लिंकवर क्लिक केल्यानंतर, फॉर्म PDF फाईलमध्ये डाउनलोड केला जाईल. फॉर्म डाउनलोड केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढा.
यानंतर, छापील अर्ज काळजीपूर्वक भरा. फॉर्म भरल्यानंतर त्याच्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा..
आता वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा कार्यालयात जाऊन अर्ज सबमिट करावा लागेल.
कार्यालयात संबंधित अधिकाऱ्याने अर्ज तपासल्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल आणि सबमिट केला जाईल.
फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुमचे रेशनकार्ड तुमच्या पत्त्यावर विभागाद्वारे पोस्टल पोस्टद्वारे वितरित केले जाईल.
अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या नवीन शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकाल..
फॉर्म 8 : नाव जोडणे ( नवं नाव ऍड करणे) :- PDF Form
फॉर्म 9: कमी करणे ( नाव काढून टाकणे) :- PDF Form
फॉर्म 14 : शिधापत्रिकेत बदल करणे :- PDF Form
फॉर्म 15 : डुप्लिकेट रेशन कार्डसाठी अर्ज :- PDF Form
नवं रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे..
निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा
LPG जोडणी असेल तर
विजेचे देयक
बँक पासबुक
ड्रायव्हिंग लायसन्स
मतदार ओळखपत्र
आधार कार्ड
इतर शासकीय ओळखपत्र ( कार्यालयीन / इतर
अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
अर्जदाराचे जात प्रमाणपत्र.