Take a fresh look at your lifestyle.

Pune Ring Road : मावळातील ‘या’ 6 गावांतील शेतकऱ्यांसाठी 900 कोटी ! बांधकामाचे टप्पेही ठरले, ‘या’ दिवशी होणार भूमिपूजन..

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पुण्यातील 136.8 किलोमीटर लांबीच्या बाह्य रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया जलद करण्यासाठी राज्य सरकारकडे आणखी 6,000 कोटी रुपयांची मागणी केली आहे, पुण्यातील बाह्य रिंगरोड पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागला असून आता या दोन्ही भागांत कामाचे बांधकामाचे टप्पेही तयार करण्यात आले आहे. (Pune Ring Road)

पुणे – सातारा महामार्गावरील यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील उर्से ते शिवरे हा 74.08 किमीचा भाग पूर्व रिंगरोडचा भाग आहे, या पूर्व रिंगरोड भागात तर शिवरे ते उर्से परतीचा 65.45 किमीचा वर्तुळाकार रस्ता पश्चिम रिंगरोडचा भाग आहे. प्रकल्पाच्या पश्चिमेकडील टप्प्यासाठी आवश्यक असलेली सुमारे 70% जमीन संपादित केली गेली आहे, तर आता पूर्वेकडील भागात भूसंपादनाला गती मिळाली असून मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांमधील 46 गावांतील जमिनीचे दर निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

यामध्ये सध्या मावळ तालुक्यातील वडगाव, कातवी, वराळे, आंबी, आकुर्डी, माणोलीतर्फ चाकण या 6 गावांमधून हा रिंगरोड जाणार असून 73.61 हेक्टर जमिनीचे दर निश्चित करण्यात आले आहे. या गावांतील जमीनदारांना भूसंपादनापोटी तब्बल 883 कोटी 55 लाख रुपयांचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे..

आता या गावातील बाधित झालेल्या जमीनदारांना भूसंपादन नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जे शेतकरी मुदतीत संमती देतील त्यांना 25 टक्के अधिक मोबदला मिळणार असल्याचं जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी सांगतले..

बांधकामाला लवकरच होणार सुरुवात..

फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या आधी या रिंग रोडचे भूमिपूजन करण्याचे शासनाचे उद्धिष्ट आहे. त्यासाठी प्रशासनाने टेंडर प्रक्रियाही सुरु केली आहे. याबाबत MSRDC चे अधिक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी सांगितले की, पूर्व आणि पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या कामासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा भरण्यासाठी एक मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे. दाखल झालेल्या निविदा चार मार्च रोजी उघडण्यात येणार आहे.

कसा असणार हा रिंगरोड..

या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेसाठी राज्य सरकारने 11,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. निधीच्या वितरणानुसार नऊ टप्प्यात बांधकाम होणार आहे. ही रक्कम टप्प्याटप्प्याने जिल्हा प्रशासनाला दिली जात आहे.

प्रस्तावित रिंगरोड 15,857 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यापासून 30 महिन्यांत तो पूर्ण होणे अपेक्षित आहे. म्हणजेच संपूर्ण प्रकल्प मे 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

रिंगरोडलगत नऊहून अधिक राष्ट्रीय महामार्ग आणि एक द्रुतगती मार्ग आहे. 120 किमी प्रतितास वेगाने वाहनांसाठी डिझाइन केलेला हा नवीन रस्ता 83 गावातून जाणार आहे.

आठ बोगदे, तीन छोटे पूल, दोन मोठे पूल आणि खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरवरुन अर्धा किलोमीटर लांबीचा मोठा पूल अशी कामे होणार असून पाच पॅकेज करण्यात आले आहे.

बांधकामाचे असे असणार टप्पे..

पश्चिम रिंगरोड टप्पे (अंतर मध्ये)

पहिला टप्पा – 14Km

दुसरा टप्पा – 20 Km

तिसरा टप्पा – 14 Km

चौथा टप्पा – 7.50 Km

पाचवा टप्पा – 9.30 Km

पूर्व रिंगरोड टप्पे

पहिला टप्पा – 11.85 Km

दुसरा टप्पा – 13.80 Km

तिसरा टप्पा – 21.20 Km

चौथा टप्पा – 24.50 Km