Take a fresh look at your lifestyle.

Tata Punch EV चा भारतभर जल्वा ! 56 मिनिटांत चार्ज ते नॉनस्टॉप 421Km रेंज, 6 एअरबॅग्ज, किंमत इतकी स्वस्त की..

0

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, टाटा मोटर्सने व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक SUV पंच EV लाँच केली आहे. ही ब्रँडची पहिली इलेक्ट्रिक कार आहे जी activ.ev प्लॅटफॉर्मवर तयार केलं जाणार आहे. यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे बॅटरी ऑप्शन मिळतील, एक 25kW जी 315 किलोमीटरची रेंज देईल आणि एक 35kW जो 421 किलोमीटरची जबरदस्त रेंज देण्यास सक्षम असेल ..

परफॉरमन्स..

या बॅटरी पॅकसह, तुम्हाला पर्मनंट मॅग्नेट सिंक्रोनस एसी मोटर मिळेल जी 114NM टॉर्क निर्माण करते आणि 90kW PMS AC मोटर जी 190NM टॉर्क निर्माण करते. या टाईपच्या इलेक्ट्रिक वाहनासाठी ही हाय परफॉर्मन्स कामगिरी देणारी करणे ठरेल यात मात्र शंका नाही. या मोटर आणि बॅटरीच्या मदतीने, टाटा पंच EV ताशी 140 किलोमीटरच्या सर्वोच्च वेगापर्यंत पोहचण्यास पात्र ठरेल तर 0 ते 100 पर्यंत वेग वाढवण्यासाठी ती फक्त 9 सेकंदाचा कालावधी घेईल.

वॉरंटी आणि चार्जर..

पंच EV ची बॅटरी आणि मोटर दोन्ही IP67 रेटिंगसह येते आणि ब्रँड 8 वर्षे आणि 1.60 लाख किलोमीटरपर्यंतची वॉरंटी देते. या वाहनाच्या लाँग रेंज व्हेरिएंटमध्ये 3.3kW आणि 7.2kW AC फास्ट चार्जर आहे. 50kW DC फास्ट चार्जरसह तुम्ही टाटा पंच EV फक्त 56 मिनिटांत शून्य ते 80% पर्यंत चार्ज करू शकता. या वाहनासाठी ही एक उत्कृष्ट आणि आकर्षक परफॉर्मन्स आहे.

ॲडव्हान्स फीचर्स..

टाटा पंच EV मध्ये अनेक ॲडव्हान्स फीचर्स पाहायला मिळतील, ज्यामुळे या वाहनाला प्रीमियम आणि लक्झरी लुक देण्यात मदत होईल. या वाहनाच्या टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला 10.25″ इन्फोटेनमेंट डिस्प्ले मिळेल ज्यामध्ये तुम्ही Apple कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो दोन्ही वायरलेस पद्धतीने चालवू शकता. तर पंच इलेक्ट्रिकच्या बेस मॉडेल्समध्ये तुम्हाला 7- इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले मिळेल. या स्क्रीन्समध्ये तुम्हाला ॲपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो यांसारखी सर्व आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी, एंटरटेनमेंट फीचर्ससह आणखी बरेच काही मिळेल..

यात बोनेटच्या खाली 14 – लिटर फ्रंक (पुढील ट्रंक) देखील समाविष्ट आहे. पंच EV ला ड्युअल – टोन इंटीरियर थीम, प्रीमियम फिनिशसह फ्रेश सीट अपहोल्स्ट्री, टाटा लोगोसह 2 – स्पोक स्टीयरिंग व्हील आणि एक मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळते. सुरक्षिततेच्या दृष्टीने, पंच EV मध्ये 6 एअरबॅग्ज, ABS, ESC, ESP, क्रूझ कंट्रोल आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी स्टॅंडर्ड फीचर्स देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.