शेतीशिवार टीम, 29 जानेवारी 2022 : महाराष्ट्राच्या भौगलिक सीमेतील कोणत्याही रस्त्यावर अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या व्यक्तीस कोणत्याही रुग्णालयात 72 तासांसाठी मोफत उपचार मिळणार आहेत. अपघातग्रस्त रुग्णांना वेळीच जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यास मृत्यूचे व अपंगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र काही वेळा आर्थिक अडचणींमुळे रुग्णांना जवळील रुग्णालयात भरती केले जात नाही. या निर्णयामुळे अशी परिस्थिती उद्भवणार नाही.जनतेच्या हिताचे निर्णय महाविकास आघाडी सरकार सातत्याने घेत असते. सदर निर्णयामुळे अपघातात मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कमी होऊन अनेकांना जीवनदान मिळणार आहे.
अपघातग्रस्त रुग्णाांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार मिळाला व रुग्णाांना जवळच्या रुग्णालयात स्थलांतरित केले तर मृत्यूचे व अपांगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. विशेषत:अस्थिभंग च्या रुग्णाांना तांत्रिककदृष्ट्या योग्य पधतीतीने स्थिर करून स्थलांतरित केल्यास त्यामुळे होणारे नुकसान टाळता येवू शकेल.
तसेच अपघातग्रस्त रुग्णास रक्तस्त्राव होत असेल व अशा रुग्णास वेळेवर स्थलांतरित केल्यामुळे रक्त व रक्तघटक मिळवून रुग्णाचे प्राण वाचतील.तसेच मेंदुला इजा झालेल्या रुग्णाांना वेळेवर ऑस्क्सजन देऊन व योग्य पधतीतीने स्थलांतरित केल्यास अशा रुग्णाचा मृत्यू व मेंदूची इजा कमी होण्यास मदत होईल.
अपघात ग्रस्त रुग्णाांना वेळीच गोल्डन आवर मध्ये उपचार मिळावा लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयात स्थलांतरित करण्याचे उद्दीष्ट्ट विचारात घेऊन दिनांक 16.09.2020 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेस मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्यात या योजनेची अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. परंतु आज त्यावर GR मंजुर झाला आहे.
शासन निर्णय:-
राज्यात रस्ते अपघातग्रस्त रुग्णाांना तत्पर (Golden Hour मध्ये) वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन
देण्यासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबववण्यास मान्यता
देण्यात येत आहे. सदर योजनेचे स्वरुप व कार्यपद्धती खालीलप्रमाणे राहील :-
योजनेचे उद्दिष्टे :-
अपघातानांतर पहिल्या 72 तासात रस्ते अपघात झालेल्या व्यक्तीस तत्पर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे.
योजनेचे लाभाथी :-
महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमेतील कोणत्याही रस्त्याांवर अपघातामध्ये गांभीररीत्या जखमी झालेल्या व वैद्यकीय उपचाराची तात्काळ आवश्यकता असलेल्या व्यक्ती (अधिवासाच्या अटीशिवाय ) या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.
औद्योवगक अपघात, दैनंदिन कामातील किव्हा घरी घडलेले अपघात व रेल्वे अपघाताने जखमी होणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच द्विरुक्ति टाळण्यासाठी या योजनेच्या लाभार्थ्यास शासनाच्या/ शासन अंगीकृत उपक्रमाच्या अपघात प्रतिपूर्तीच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.
योजनेंतर्गत देण्यात येणारे लाभ:-
रस्ते अपघातातील जखमी झालेल्या रुग्णाांची परिस्थिती स्थिर करण्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सेवा पहिल्या ७२ तासासाठी नजीकच्या अंगीकृतरुग्णालयामधून ७४ उपचार पधतीतींच्या (परिशिष्ट-अ) माध्यमातून देण्यात येतील.
योजनेंतर्गत अपघातग्रस्त रुग्णास पूर्णपणे मोफत वैद्यकीय उपचाराांचा लाभ देण्यात येईल. योजनेंतर्गत अपघात रुपये 30,000 / – (रु. तीस हजार) पर्यंतचा खर्च केलेल्या package च्या दरानुसार या योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयास विमा कंपनीकडून अदा करण्यात येईल.
स्थालांतरित करण्यात आलेल्या रुग्णालयात पुढील उपचाराच्या सेवा उपलब्ध नसल्यास अशा सेवा उपलब्ध असणाऱ्या जवळच्या रुग्णालयात १०८ रुग्णवाहकेने, ती उपलब्ध नसल्यास पयायी रुग्णवावहकेने रुग्ण स्थलाांतवरत केला जाईल.
अशा परिस्थितीत package च्या दारा व्यतिरिक्त रुपये 1000 पर्यंत रुग्ण वाहकेचे भाडे विमा कंपनी माफव त अंगीकृत रुग्णालयास देण्यात येईल.
रुग्णालय जर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना / प्रधानमांत्री जन आरोग्य योजनेंतर्गत मान्यताप्राप्त असेल व रुग्ण सदर योजनेचा लाभाथी असेल व होणारे उपचार योजनेपैकी असून त्याची पूर्व मंजुरी मिळाली असेल तर त्या उपचारासंबंधी या योजनेची रक्कम रुग्णालयास मिळणार नाही.
अशा परिस्थिती रुग्णालयास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या / प्रधानमांत्री जन आरोग्य योजनेच्या पॅकेज ची आथिक तरतूद रुग्णालयास मिळणार आहे.