शेतीशिवार टीम, 28 जानेवारी 2022 : तसं,अल्कहोल पिणे आरोग्यासाठी चांगले मानलं जात नाही आणि त्याचं जास्त प्रमाणांत सेवन देखील नये कारण त्याचा तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रेड वाईनचे (Red wine) असे अनेक फायदे देखील आहेत, जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील, खरं तर अनेक संशोधनातून असे आढळून आले आहे की, जर तुम्ही रेड वाईनचे (Red wine) मर्यादेत सेवन करत असाल तर, यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचणार नाही, पण यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळूही शकतात.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की, रेड वाईन (Red wine) तुमच्या आरोग्यासाठी चांगली असते. खरं तर, एका संशोधनात असे आढळून आले आहे की, वाईनच्या सेवनामुळे आतड्यांमधील मायक्रोबायोटा (Microbiotic) ची विविधता वाढते. तसेच शरीरातलं खराब कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणाची पातळी कमी होते. संशोधनात असे दिसून आले आहे की, रेड वाईन पिणार्‍यांच्या आतड्याचे मायक्रोबायोम रेड वाईन न पिणार्‍यांपेक्षा अधिक वैविध्यपूर्ण (Diverse) असते.

चला तर मग जाणून घेऊया सविस्तर :-

रेड वाईन पिण्याचे फायदे :-

1. रेड वाईनमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी-6 आणि व्हिटॅमिन-सी असते. त्यात अनेक ऍक्टिव अँटिऑक्सिडंट्स देखील असतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवतात.

2. अँटिऑक्सिडंट्सने भरपूर असल्याने, रेड वाईन तणाव कमी करण्यास आणि फ्री रॅडिकल्स टाळण्यास देखील मदत करते. यामुळे तुमची त्वचा तरुण दिसते.आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. दिल्ली, मुंबई सारख्या शहरांमधील तरुणी यासाठी वाईनचं सेवन करतात.

3. द्राक्षापासून रेड वाईन बनवली जाते, यामुळे ते चांगले गुड कोलेस्ट्रॉल वाढवून तुमचे आरोग्य चांगले ठेवते, तसेच हृदय आणि वजन संतुलित ठेवते.

4. रेड वाईनचे सेवन सौंदर्याच्या दृष्टीनेही चांगले मानले जाते. बऱ्याच स्त्रिया आपल्या स्किन विषयी तक्रार करतात की वयानुसार त्यांच्या त्वचेचा रंग कमी होऊ लागतो . अशा परिस्थितीत रेड वाईनचा फेस पॅक उपयुक्त ठरतो.

5. जर तुम्ही रात्री झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर रेड वाईन तुमचा चांगला उपाय असल्याचे सिद्ध होते. रेड वाईनचे सेवन केल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.

6. एका संशोधनातून असे समोर आले आहे कि, रेड वाईनच्या सेवनाने महिलांमध्ये सेक्स हार्मोन इस्ट्रोजेन वाढते, ज्यामुळे सेक्स ड्राइव्ह देखील वाढते.

7. रेड वाईनमध्ये पॉलीफेनॉल असते जे अँटिऑक्सिडेंट असते. हे रक्तवाहिन्या लवचिक बनवते आणि हृदयविकारापासून दूर ठेवते.

8. रेड वाईनमध्ये आढळणारा रेसवेराट्रॉल (Resveratrol) नावाचा घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो. अशा प्रकारे मधुमेह (Diabetes) टाळता येतो.

9. रेड वाईन सेवन केल्यामुळे हिरड्यांची सूज कमी होते. बॅक्टेरिया दूर होतात आणि दातही मजबूत होतात.

10. रेड वाईन प्यायल्याने स्मरणशक्तीही सुधारते. हे मेंदूचे कार्य सुधारते. ज्यामुळे तुम्ही जुन्या गोष्टी सहज लक्षात ठेवू शकता.

11. रेड वाईन प्यायल्याने पचनशक्ती मजबूत होते. यामुळे पोटातील बॅड बॅक्टेरिया नष्ट होतात आणि पोटातील अल्सरही कमी होतो.

12. युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियाच्या संशोधनानुसार आठवड्यातून एक ग्लास रेड वाईन प्यायल्याने कॅन्सरसारख्या घातक आजारांपासूनही बचाव होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *