शेतीशिवार टीम, 28 जानेवारी 2022 : कोरोना महामारीच्या काळात भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिला आहे. गेल्या दीड वर्षात असे अनेक स्टॉक्स आले आहेत ज्यांनी आपल्या शेअरहोल्डर्सना शानदार रिटर्न्स देऊन श्रीमंत केलं आहे. यात पेनी स्टॉकचाही मोठा वाटा आहे. जरी, पेनी स्टॉकमध्ये जास्त जोखीम असली तरी रिटर्न्स देण्याच्या बाबतीत या शेयर्सनां तोड नाही.

असाच एक पेनी स्टॉक म्हणजे एचसीपी प्लास्टीन बल्कपॅक लि. (HCP Plastene Bulkpack Ltd) जो गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर असल्याचं सिद्ध झालं आहे. कंपनीच्या शेयर्सनी गेल्या 11 महिन्यांत गुंतवणूकदारांना 6,643 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर –

11 महिन्यांत तब्बल 6,643.34% रिटर्न्स :-

HCP प्लास्टिक बल्क पॅक लिमिटेडच्या (HCP Plastene Bulkpack Ltd) शेयर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना एका वर्षापेक्षा कमी कालावधीत श्रीमंत केलं आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger stock) 11 महिन्यांपूर्वी ₹8.26 (BSE 26 मार्च 2021 रोजी बंद किंमत) वरून ₹588 (28 जानेवारी 2022) वर गेला आहे. या कालावधीत या शेयर्सने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 6,643.34% रिटर्न्स दिले आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत, हा स्टॉक रु 88.35 (28 जुलै 2021) वरून रु. 588 पर्यंत वाढला आहे, या काळात या स्टॉकने 530.45% रिटर्न्स दिले आहे.

गुंतवणूकदारांना झाला करोडोंचा फायदा…

HCP Plastene Bulkpack Ltd च्या शेयर्समध्ये जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये (Multibagger stock)
₹ 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे ₹ 1 लाख आज ₹ 67.43 लाख झाले असते. या 6 महिन्यांपूर्वी, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 6.30 लाख झाले असते.

या कंपनीचे आधीचं नाव गोपाला पॉलीप्लास्ट लिमिटेड (Gopala Polyplast Ltd) होतं, कंपनीने गेल्या वर्षी त्याच नाव बदलून HCP प्लास्टिक बल्क पॅक लिमिटेड केले आहे. कंपनीचा स्टॉक आता HCP Plastics Bulk Pack Ltd या नावाने विकला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *