ॲग्रो – मराठी टीम, 22 मे 2022 :- देशात पेट्रोल आणि डिझेलबाबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क (Excise duty) कमी केली आहे, तर अनेक राज्य सरकारांनी पेट्रोल – डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. या क्रमवारीत केरळ आणि ओडिशापाठोपाठ आता आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारनेही आज रविवारी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात पेट्रोलवर 2.08 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर 1.4 रुपयांनी व्हॅट कमी करण्यात आला आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे…
केंद्र सरकारने काल शनिवारी रात्री उशिरा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या, त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच सरकारने गॅस सिलेंडरमध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली. या सर्व निर्णयामुळे उज्वला गॅस धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ही माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांनी कपात केली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपयांची कपात करण्यात आल्याचे सरकारने सांगितले.
केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर काही वेळातच केरळ आणि ओडिशा सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केला आहे. केरळ सरकारने पेट्रोलवरील कर 2.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील कर 2.36 रुपयांनी कमी केला आहे. आता या पाठोपाठ महाराष्ट्र राज्यानेही व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला.
पहा, तुमच्या शहरातील नवे दर…
मुंबईत पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर आहे
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62रुपये प्रति लिटर
कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे
लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर आहे