शेतीशिवार टीम, 22 मे 2022 :- सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई लोहमार्ग पोलिस विभागात (Mumbai Railway Police Bharti : 2022) 505 जागांसाठी मेगाभरतीची अधिसूचना जारी केली आहे. Police Constable पदांसाठी ही भरती असणार आहे.
अर्ज ऑनलाइन पद्धतीनं खाली दिलेल्या लिंकवर करायचा आहे. 12 वी उत्तीर्ण आणि अन्य उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
शैक्षणिक पात्रता :-
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शारीरिक क्षमता :-
उंची – महिलांसाठी – 155 cm
पुरुषांसाठी – 165 cm पुरुषांसाठी छाती 79 cm पेक्षा कमी नसावी.
अर्ज शुल्क :-
खुला प्रवर्ग: 450 /- रुपये
मागास प्रवर्ग: 350 /- रुपये
आवश्यक कागदपत्रे :-
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी :- https://mumbairlypolice.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.