शेतीशिवार टीम, 22 मे 2022 :- BSF भर्ती 2022: बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) ने इन्स्पेक्टर भरतीसह विविध ‘Group -B’ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज प्रक्रिया 8 जून 2022 पर्यंत (23.59 PM पर्यंत) खुली असणार आहे.

अधिकृत अधिसूचनेत असं म्हटलं आहे की, BSF भरतीद्वारे स्थापन केलेल्या अभियांत्रिकीमध्ये ‘Group -B’ कॉम्बॅटाइज्ड ((Non Gadget – Non Ministerial) 90 पदांसाठी अर्ज मागवले आहेत…

BSF Recruitment 2022 : जाणून घ्या, पदांबद्दल…

ज्यूनियर इंजीनियर / सब इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल) – 32 पदे

इन्स्पेक्टर (आर्किटेक) – 1 पद

सब इंस्पेक्टर (Works) – 57 पदे

शैक्षणिक पात्रता :-

इन्स्पेक्टर (आर्किटेक्चर) साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्किटेक्चरची (Architecture) पदवी असणे आवश्यक आहे.सब इंस्पेक्टर (SI) साठी अर्जदार Civil Engineering मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा कोर्स आणि ज्यूनियर इंजीनियर / SI कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून Electrical engineering मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा कोर्स असलेले…

अर्ज शुल्क :-

उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. सर्व प्रवर्गातील महिला उमेदवार आणि SC, ST, BSF सेवा देणारे कर्मचारी आणि माजी सैनिक यांच्या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अर्ज फी कोणत्याही बँकेच्या नेट बँकिंगद्वारे, कोणत्याही बँकेच्या क्रेडिट / डेबिट कार्डद्वारे भरली जाऊ शकते…

वय मर्यादा :-

जे उमेदवार इंस्पेक्टर (आर्किटेक), सब इंस्पेक्टर (वर्क्स), जूनियर इंजीनियर / सब इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल) या पदांसाठी अर्ज करतील त्यांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. SC / ST / PwBD / XSM श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

जाणून घ्या – कशी होणार निवड प्रक्रिया :-

या पदांवरील निवड लेखी परीक्षेद्वारे होईल. परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात लेखी चाचणी असते, तर पहिल्या टप्प्यातील परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षेसाठी निवड मंडळासमोर हजर होतील…

ज्यामध्ये डॉक्यूमेंटेशन, फिजिकल स्टॅडर्ड टेस्ट (PST) आणि फिजिकल एफिशिएंसी टेस्ट (PET) समाविष्ट आहे. वरील सर्व स्टेप्स पार केल्यानंतर, निवडलेल्या उमेदवारांना मेडिकल टेस्ट द्यावी लागेल, जी त्यांच्या फिटनेसचे मूल्यांकन करण्यासाठी वैद्यकीय मंडळाद्वारे घेतली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिकृत अधिसूचना वाचू शकतात…

पगार :-

इन्स्पेक्टर आर्किटेक – रु 44,900 -1,42,400

ज्यूनियर इंजीनियर / सब इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल) आणि सब इंस्पेक्टर (Works) – रु. 35,400 ते 1,12,400

कशी असणार परीक्षा :-

ही परीक्षा 100 गुणांची असेल ज्यामध्ये जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस, रिझनिंग, न्यूमेरिक अ‍ॅप्टिट्यूडचे 10 गुणांचे 10 प्रश्न असतील. त्याचबरोबर टेक्निकल सब्जेक्टचे 60 प्रश्न 60 गुणांसाठी येतील. परीक्षेचा कालावधी 2 तासांचा असेल…

इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in द्वारे अर्ज करू शकतात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *