VIDEO : ड्रॉयव्हरचं नियंत्रण सुटलं अन् टाटा Punch ने थेट फिल्मी स्टाईलमध्ये विटांची थप्पी उडवली ; पहा, प्रवाशाचं काय झालं हाल ?

0

शेतीशिवार टीम, 22 मे 2022 :- तुम्ही रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये गाड्या उडताना, आदळताना पाहिल्या असतील.ही दृश्ये पाहून तुम्हालाही मजा आली असेल. अनेक प्रसंगी रुपेरी पडद्यावर दिसणारी अशी दृश्ये आपल्याला समोरू ही दिसतात. असाच एक व्हिडिओ बिहारमधील गोपालगंजमधून समोर आला आहे. येथे भरधाव वेगातील Tata Punch विटांच्या ढिगाऱ्यावर आदळली. ही टक्कर इतकी जोरदार होती की, विटांचा संपूर्ण ढिगारा हवेत उडून गेला. मात्र, या अपघातात टाटा पंच (Tata Punch) प्रवाशांसाठी किती सुरक्षित आहे, याचा प्रत्ययही समोर आला आहे. या अपघाताबद्दल आणि टाटाच्या सेफ्टीबद्दल आपण जाणून घेऊया…

काय आहे, संपूर्ण प्रकरण ?

हे प्रकरण बिहारमधील गोपालगंजचे आहे. येथे Tata Punch चा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. प्रत्यक्षात रस्त्याच्या कडेला एका दुकानासमोर विटांचा ढीग होता. त्यामुळे भरधाव वेगात असलेलया Tata Punch चे नियंथन सुटलं आणि ती थेट विटांच्या ढिगार्याला धडकली, टाटा पंच पूर्णपणे अनियंत्रित होती, त्यामुळे हा अपघातही जोरदार होता. पंच विटांच्या ढिगाऱ्यावर आदळली अन् सर्व विटा हवेत उडताना दिसल्या. ढिगाऱ्यावर आदळल्यानंतर गाडी थांबली अन् अपघातानंतर काही सेकंदात चालक आणि प्रवासी गाडीतून सुखरूप बाहेर पडले. त्यांना एक जखमही झाली नाही. यावरून हे सिद्ध झालं की Tata Punch चे 5-स्टार सुरक्षा रेटिंग पूर्णपणे योग्य आहे.

एडल्ट सेफ्टीसाठी 17 पैकी मिळाले 16.45 गुण :-

G-NCAP नुसार, Tata Punch च्या बेस व्हेरिएंटची टेस्ट घेण्यात आली. बेस व्हेरियंटमध्ये ड्युअल-फ्रंट एअरबॅग, ABS आणि चाइल्ड सीट माउंट करण्यासाठी ISOFIX अँकर आहेत. टाटा पंचने एडल्ट सेफ्टी रेटिंगमध्ये 17 पैकी 16.45 गुण मिळवले आहेत. मुलांच्या सुरक्षेसाठी पंचने पैकी 40.89 गुण मिळवले. म्हणजेच, हे सर्व प्रौढ आणि मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

टाटा पंचच्या इंजिन बद्दल जाणून घेऊ…

Tata Punch फक्त एका इंजिनसह लॉन्च करण्यात आली आहे. जे 1.2 लीटर, नॅचुरली एस्पिरेटेड, तीन-सिलेंडर, रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन आहे. हे 6,000rpm वर 85bhp पॉवर आणि 3,300rpm वर 113Nm टॉर्क निर्माण करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा AMT ट्रान्समिशनशी जोडलेलं आहे. ट्रॅक्शन प्रो मोड त्याच्या AMT व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज 18.97Km/l आहे आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटचे मायलेज 18.82Km/l आहे. हे Pure, Adventure, Exclusive आणि Creative अशा 4 व्हेरियंटमध्ये लॉन्च केलं आहे. हे ऑर्कस व्हाईट, डेटोना ग्रे, कॅलिप्सो रेड, टोर्नाडो ब्लू, ट्रॉपिकल मिस्ट, ॲटॉमिक ऑरेंज आणि मिटिअर ब्रॉन्झ या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

 

टाटा पंच चे इंटेरियर :-

या मायक्रो एसयूव्हीमध्ये ड्युअल टोन इंटीरियर उपलब्ध आहे. कारमध्ये 7-इंच स्क्रीनसह हरमन फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. हे Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते. 7-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, लेदर रॅप्ड फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, सिटी आणि इकोचे दोन ड्राईव्ह मोड, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण, हाय-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट यासारख्या फिचर्ससह सुसज्ज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.