LPG Subsidy : गॅस सिलिंडरवर 200 रुपये अनुदान देण्याची घोषणा ; पण कोणाला मिळणार ‘हे’ अनुदान पहा…

0

शेतीशिवार टीम, 21 मे 2022 :- देशातील महागाईचे सध्याच्या आकड्यांनी आत्तापर्यंतचे अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढले होते. सरकारने जाहीर केलेल्या घाऊक आणि किरकोळ महागाईचे आकडे हे दर्शवत होते की, महागाईचा मोठा हिस्सा पेट्रोल आणि डिझेलमुळे वाढलेला आहे. चलनवाढीचा दर आता आपल्या मानक मर्यादा ओलांडला असल्याचे RBI सतत सूचित करत होते.

अशा स्थितीत काळाची मागणी समजून मोदी सरकारने महागाईवर मोठा प्रहार केला आहे. आज संध्याकाळी 6.40 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून घोषणा केली की, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यासोबतच, अर्थमंत्र्यांनी असेही सांगितले की, यावर्षी आम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी देऊ.

परंतु अशा बातम्या पसरवल्या जात होत्या की, गॅस सिलेंडर 200 रुपयांनी कमी झाला आहे, परंतु या बातम्या खोट्या असून हे अनुदान केवळ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनाच मिळणार आहे.

इतकं मिळेल अनुदान :-

त्याचवेळी गॅस सिलिंडरच्या किंमतींचा विचार करता सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने अनुदान म्हणून 200 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अर्थमंत्र्यांनी ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, “यावर्षी पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी देणार आहेत. यामुळे आमच्या माता-भगिनींना मदत होईल. यामुळे सुमारे वार्षिक महसुलावर (6100 crore) परिणाम होणार आहे.

अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर 200 रुपये सबसिडी मिळणार आहे. मात्र, त्यांना हे अनुदान 12 सिलिंडरपर्यंतच मिळणार आहे.

आता किती आहे किंमत…

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सध्या देशात घरगुती गॅसची किंमत 1000 ते 1100 रुपयांच्या दरम्यान आहे. त्याच महिन्यात तेल कंपन्यांनी घरगुती गॅस (14.2 किलो) सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ केली. त्यानंतर घरगुती सिलिंडरची किंमत 999.50 रुपये प्रति सिलिंडर झाली. याआधी मार्चमध्ये घरगुती सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. अशा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या या घोषणेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे…

प्लास्टिक उत्पादनांवरील कस्टम ड्युटीही केली कमी..

सीतारामन म्हणाल्या की, ज्या प्लास्टिक उत्पादनांवर आमची आयात अवलंबित्व जास्त आहे, अशा कच्च्या मालावरील कस्टम ड्युटी देखील आम्ही कमी करत आहोत. काही स्टील कच्च्या मालावरील आयात शुल्कही कमी केले जाईल. काही स्टील उत्पादनांवर निर्यात शुल्क आकारले जाईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सिमेंटची उपलब्धता सुधारण्यासाठी नियम लागू केले जात आहेत आणि सिमेंटची किंमत कमी करण्यासाठी उत्तम लॉजिस्टिकचा अवलंब केला जात आहे.

शनिवारी असे होते पेट्रोल आणि डिझेलचे दर :-

शनिवारी देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 96.67 रुपये प्रति लिटर होता. मुंबईत पेट्रोलचा दर 115.51 रुपये आणि डिझेलचा दर 105.77 रुपये प्रति लिटर होता.

कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 115.12 रुपये आणि डिझेलचा दर 99.83 रुपये प्रति लिटर होता. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटरने विकले गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.