शेतीशिवार टीम, 21 मे 2022 :- जर्मन रिटेलर Metro AG भारतातून व्यवसाय संपवण्याच्या तयारीत आहे. खरं तर, Metro AG भारतीय उपकंपनी Metro Cash & Carry India मधील आपला हिस्सा विकण्यासाठी भागीदार शोधत आहे. PTI या वृत्तसंस्थेने एका सूत्राच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

सूत्रांनी सांगितलं की, मेट्रो एजी (Metro AG) आता आपल्या भारतीय युनिटच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर धोरणात्मक बाह्य टाय-अप शोधत आहे. याबाबत बँकर्सशी काही चर्चा झाली आहे. मेट्रो कॅश अँड कॅरी इंडियाचे (Metro Cash And Carry India) भारतात 30 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.

अंबानी-दमाणी-टाटाशी केला संपर्क :-

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, Metro AGने मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल, राधाकिशन दमानी यांच्या एव्हेन्यू सुपरमार्ट्स (D-mart) आणि टाटा ग्रुपशी भागभांडवल विक्रीसाठी संपर्क साधला आहे. याशिवाय, Amazon, थायलंडचा Charon Pokfund (CP) Group, Lulu Group आणि PE फंड समारा कॅपिटल यांच्याशी सुरुवातीच्या टप्प्यात चर्चा झाली आहे.

सूत्रानुसार, भारतीय व्यवसायाला आपले नेटवर्क वाढवण्यासाठी आणि अधिक स्टोअर्स जोडण्यासाठी अधिक गुंतवणूकीची गरज आहे. त्याचवेळी Metro AG च्या प्रवक्त्यानेही कंपनी धोरणात्मक ऑप्शनचा आढावा घेत असल्याचे मान्य केलं आहे.

Metro AG चे Corporate Communications गेर्ड कोस्लोव्स्की म्हणाले की, मेट्रो इंडिया हा घाऊक विक्रीसाठी प्रचंड क्षमता असलेला वाढता व्यवसाय आहे. मेट्रोची विद्यमान घाऊक क्षमता वाढवण्यासाठी आणि भारतातील व्यवसाय वाढीला गती देण्यासाठी आम्ही संभाव्य भागीदारांसह पर्यायांचे पुनरावलोकन करत आहोत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *