शेतीशिवार टीम, 6 जानेवारी 2022 : मुंबईत कोरोना रुग्णांचा पुन्हा मोठा स्फोट झाला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. मुंबईत येत्या काही दिवसांत खूपच भीषण परिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज मुंबईत तब्बल 20 हजारांपेक्षा नवे रुग्ण आढळले असून मुंबईची प्रसिद्ध झोपडपट्टी असलेलया धारावी परिसरातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला आहे. धारावीतील एकाच ठिकाणी आज 100 नवे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या 24 तासांत एकट्या मुंबईत 20181 नवे रुग्ण आढळले असून 4 रुग्णांचा मृत्यू झाला झाल्याचे समोर आले आहे. आज 2 हजार 837 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. 20 हजारांहून अधिक नवीन रुग्णांसह शहरातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या 79260 वर पोहोचली आहे. तर राज्यात हा आकडा 1,14,847 वर पोहोचला आहे. कोरोनाचं दिवसेंदिवस हे वाढतं प्रमाण पाहून प्रशासनासह मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे.

तर आज संपूर्ण राज्यात गेल्या 24 तासांत 36265 नवे रुग्ण आढळळून आले आहे. तर 13 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर आज राज्यात Omicron चे मुंबई – 57, ठाणे – 7, नागपूर – 6 पुणे 5, पुणे ग्रामीण – 3 पिंपरी-चिंचवड – 1 मिळून आज 79 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचे हे दिवसेंदिवस वाढणारे आकडे अक्षरश: धडकी भरवणारे आहे.

राज्य सरकाकडून तूर्तास लॉकडाऊन करण्यात आलं नसलं तरी येत्या काही दिवसांत मुंबईत राज्यभरात कठोर निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनीही कोरोना रुग्णांची संख्या एका दिसत जर 20 हजारांच्या पुढे गेली तर मुंबईत लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आता मुंबईत येत्या 2 दिवसांत लॉकडाऊन अटळ असल्याचंच अधोरेखित होताना पाहायला मिळतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *