शेतीशिवार टीम, 6 जानेवारी 2022 : UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.
खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये खूप मदत करू शकतात.
प्रश्न – अँडव्होकेट आणि लॉयर यांच्यात काय फरक आहे ?
उत्तर – Lawyer म्हणजे ज्याच्याकडे लॉ (Law) ची डिग्री आहे, परंतु त्याला कोणत्याही न्यायालयात खटला लढण्याची परवानगी नसते. लढण्यासाठी Lawyer ला बार कौन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा उत्तीर्ण करून परवाना घ्यावा लागतो, त्यानंतर तो अँडव्होकेट बनतो. अँडव्होकेट ही अशी व्यक्ती असते जिच्याकडे बार कौन्सिल ऑफ इंडियाचा परवाना (License) असतो.
प्रश्न – भारतातील सर्वात जुने राज्य कोणतं आहे ?
उत्तर – बिहार हे भारतातील सर्वात जुने राज्य असल्याचे म्हटले जाते.
प्रश्न – हत्ती आपल्या सोंडेत किती पाणी धरू शकतो ?
उत्तर – हत्ती एका वेळी सुमारे 14 लीटर पाणी सोंडेमध्ये घेऊन पाणी पिऊ शकतो, असचं तो एका वेळी 160 लिटर पाणी पिऊ शकतो…
प्रश्न – भारतातील सर्वात महागडी ट्रेन कोणती आहे?
उत्तर – महाराजा एक्सप्रेस
प्रश्न- कोणत्या प्राण्याची हाडे सर्वात जास्त मजबूत असतात ?
उत्तर – वाघ
प्रश्न – भारताव्यतिरिक्त कमळ हे कोणत्या देशाचं राष्ट्रीय फूल आहे ?
उत्तर – भारताव्यतिरिक्त व्हिएतनाम (Vietnam)हा एकमेव देश आहे ज्याचे राष्ट्रीय फूल कमळ आहे.
प्रश्न – कोणत्या देशांकडे स्वतःच सैन्य नाही ?
उत्तर – जगात असे अनेक देश आहेत ज्यांनी सुरक्षेसाठी सैन्यापेक्षा पोलिसांवर जास्त अवलंबून आहे, त्यामुळे सुमारे 7 देशांमध्ये सैन्य नाही, ते आहेत – कोस्टा रिका, पनामा, हैती, सोलोमन बेटे, नाउरू, ग्रेनाडा आणि व्हॅटिकन सिटी.
प्रश्न – भारत रत्न पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला कोण ?
उत्तर – इंदिरा गांधी
प्रश्न – भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणतं ?
उत्तर – 1 महाराष्ट्र GDP – 32.24 लाख कोटी / 2 ) तामिळनाडू – 19.43 लाख कोटी / 3 ) उत्तर प्रदेश – 17.05 लाख कोटी