शेतीशिवार टीम, 7 जानेवारी 2022 : आयुर्वेदिक औषधांचा अनेक वर्षांपासून विविध आरोग्यदायी फायद्यांसाठी जगभरात वापर केला जात आहे. अश्वगंधा हे असेच एक औषध आहे जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानलं गेलं आहे.

आयुर्वेदात अश्वगंधाच्या सेवनाबद्दल विशेष उल्लेख आहे, त्याचे वर्गीकरण एडाप्टोजेन म्हणून करण्यात आलं आहे, याचा अर्थ असा की, तणाव प्रतिबंधित करण्यासाठी ते खूप फायदेशीर ठरू शकतं.

याशिवाय अश्वगंधा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. मेंदूच्या कार्याला चालना देण्याबरोबरच, रक्तातील साखर आणि कोर्टिसोलची (स्टिरॉइड हार्मोनपैकी एक) पातळी नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतं.

आयुर्वेद तज्ञांच्या मते, अश्वगंधा चूर्ण हे सर्व लोकांनी सेवन करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठीही हे औषध खूप फायदेशीर मानलं जातं.

मधुमेहींसाठी फायदेशीर :-

रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी अश्वगंधा प्रभावी ठरू शकतं असे अनेक अभ्यासात आढळून आले आहे. एका टेस्ट-ट्यूब अभ्यासात असे आढळून आले आहे की, यामुळे इंसुलिन स्राव वाढला आणि स्नायूंच्या पेशींमध्ये इंसुलिनची संवेदनशीलता सुधारते.

याव्यतिरिक्त,मानवी अभ्यासात असे आढळून आले आहे की, अश्वगंधा निरोगी आणि मधुमेही रूग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतं.

तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर :-

तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी अश्वगंधा वर्षानुवर्षे वापरलं जाणारं औषध आहे. मानवी अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तणाव आणि चिंताग्रस्त विकार असलेल्या लोकांमध्ये लक्षणे कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते.

6 आठवड्यांच्या अभ्यासात असे आढळून आले की, अश्वगंधा घेतलेल्या 88% लोकांना कमी चिंता जाणवते. मानसिक शांतता वाढवण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त :-

अश्वगंधा हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी औषधांपैकी एक मानले जातं. हे जैविक दृष्ट्या सक्रिय पदार्थ, अमीनो ऍसिड, पेप्टाइड्स, लिपिड्स आणि न्यूक्लिक एसिडमध्ये समृद्ध आहे, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. हे एक औषध आहे जे रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासोबत तणाव हार्मोन कमी करण्यास मदत करते.

अश्वगंधाचे सेवन कसे करावे :-

अश्वगंधा चूर्ण खाण्याची पद्धत अगदी सोपी आहे. सकाळी अश्वगंधा पावडर पाण्यात, मध किंवा तूपात मिसळून सेवन करता येतं. याशिवाय अश्वगंधा कॅप्सूल, अश्वगंधा चहा बाजारात आणि ऑनलाइन सहज मिळू शकतात.

अश्वगंधाचे कधी सेवन करावे :- रात्री झोपण्यापूर्वी त्याचे कोमट दुधासोबत सेवन केल्यास अधिक फायदा होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *