शेतीशिवार टीम, 7 जानेवारी 2022 : भारतात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. आज कोरोनाची भयावह वाढ पाहता पहिले दिवस पुन्हा आले आहे. देशात गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक कोरोना रूग्णवाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

भारतात गेल्या कोरोना संसर्गाची 1.17 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहे. गेल्या 7 महिन्यांतुन म्हणजे 5 जून 2021 पासून दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. देशात Covid-19 च्या नवीन प्रकार ‘Omicron’मुळे तिसरी लाट सुरू झाली आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, Omicron मुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग दुसऱ्या लाटेपेक्षा खूप वेगाने पसरत आहे.

गेल्या 24 तासांत रुग्णसंख्या 1,17,000 हजारापर्यंत आढळल्याने दैनंदिन रुग्णसंख्या केवळ 10 दिवसांत 10 पट ओलांडली आहेत. 28 डिसेंबर रोजी फक्त 9,155 कोरोना केसेस वाढल्या होत्या.

दिल्ली-मुंबईत भयावह वाढ…

दिल्लीत गुरुवारी15,097 नवे रुग्ण आढळले आहे. जी गेल्या वर्षी 8 मे नंतर सर्वाधिक आहे. गेल्या दोन दिवसांत दिल्लीत दैनंदिन रुग्णसंख्यांमध्ये तिपटीने वाढ झाली आहे. यापूर्वी, मंगळवारी 5,481 आणि बुधवारी 10,665 नवे रुग्ण नोंदवले. मुंबईतही अशीच वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी 10,606 आणि बुधवारी 15,014 प्रकरणे समोर आली. त्याच वेळी, गुरुवारी 19,780 नव्या रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण नोंदवली जात आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात 36365 नवीन रुग्णांची नोंद झाली, जी देशातील कोणत्याही राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. 16 मे 2021 पासून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, काल पश्चिम बंगालमध्ये 15421 नव्या रुग्णांची पुष्टी झाली आहे.

तिसरी लाट धडकली…  

देशभरातील 12 राज्य सरकारांनी आधीच रात्रीचा कर्फ्यू आणि शनिवार व रविवार लॉकडाउन तसेच शाळा बंद केल्या आहेत. परंतु, अनेक राज्यांमध्ये राजकीय मोर्चे सुरू आहेत, जेथे पुढील काही आठवडे आणि महिन्यांत निवडणुका होणार आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सर्व राज्यांना जिल्हा आणि उपजिल्हा स्तरावर 24×7 नियंत्रण कक्ष पुन्हा स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. गंभीर रूग्णांसाठी रूग्णवाहिका बुकींग आणि रूग्णालयातील बेड यांसारख्या सुविधा सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

केंद्राकडून राज्यांना नव्या गाईडलाईन्स जारी..

केंद्र सरकारने नियंत्रण कक्षात वैद्यकीय डॉक्टर, समुपदेशक आणि इतर संबंधित कर्मचार्‍यांसह स्वयंसेवकांचा पुरेसा कर्मचारी वर्ग सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.

केंद्राच्या निर्देशाने या नियंत्रण कक्षांमध्ये अखंड कनेक्टिव्हिटीसाठी संगणक आणि ब्रॉडबँडच्या दृष्टीने पायाभूत सुविधा सक्षम करण्याच्या गरजेवर भर दिला आहे आणि निर्दिष्ट लोकसंख्येसाठी पुरेशा फोन लाईन आहेत. याशिवाय, प्रत्येक प्रकरणाच्या आधारावर नियंत्रण कक्षांना चोवीस तास कार्यरत राहण्यास सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *