शेतीशिवार टीम, 22 जून 2022 : भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) अग्निपथ योजनेअंतर्गत (agniveer recruitment 2022) देशातील तरुणांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. हवाई दलाने या योजनेअंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

भरतीचे नोटिफिकेशन हवाई दलाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलं आहे. 24 जूनपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जुलै आहे.

तर 24 जुलै 2022 पासून परीक्षा सुरू होणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट careerindianairforce.cdac.in किंवा https://indianairforce.nic.in वर भरतीशी संबंधित अधिक माहिती पाहू शकतात. हवाई दलाकडून अग्निवीरांची ही भरती ऑनलाइन घेतली जाणार आहे.

ऑनलाइन अर्ज आणि परीक्षा शुल्क :-

हवाई दलाने अग्निविरांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट careerindianairforce.cdac.in वर ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्जाची फी 250 रुपये आहे. जे उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी दरम्यान भरावे लागतील. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे फी भरली जाऊ शकते.

वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता :-

अग्निविरांसाठी 17 ते 23 वर्षे वयोगटातील तरुण अर्ज करू शकतात. (29 डिसेंबर 1999 ते 29 जून 2005 दरम्यान जन्मलेले या भरतीसाठी पात्र असणार आहे)

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून 10वी किंवा 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

3 वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा असावा.

12 वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश, भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह 50% मार्क्स असावेत.

कसं होणार सिलेक्शन :-

अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या अग्निवीरांना ऑनलाइन टेस्ट द्यावी लागणार आहे. परीक्षेनंतर पुढील प्रक्रिया होईल. 24 जुलैपासून ऑनलाइन परीक्षा होणार आहे. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगही असणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील. कमिशन्ड ऑफिसर, पायलट, नेव्हिगेटर म्हणून निवडीसाठी सिलेक्शन टेस्ट होणार नाही…

परीक्षेशी संबंधित महत्त्वाची तारीख :-

ऑनलाइन रजिस्ट्रेशन 24 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख 5 जुलै 2022 आहे. त्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

24 जुलैपासून ऑनलाइन परीक्षा सुरू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *