Pune Metro : भारतातला सगळ्यात खोल भुयारी बोगदा पुण्यात; 108 फूट खोल, 8,100 कोटींचा खर्च, कधी कराल प्रवास ? पहा स्टेशन्स अन् रूट मॅप…
मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट (17Km) आणि वनाझ ते रामवाडी (16 Km) अशा दोन मार्गिका आहेत. दोन्ही मार्गिका सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे एकमेकांना छेदतात आणि त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक एक महत्त्वाचे स्थानक म्हणून उभारण्यात येत आहे. या स्थानकाचे सर्व काम 95% पूर्ण झालं असून एका महिनाभरात पूर्ण होणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मेट्रो सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकामधे पीसीएमसी ते स्वारगेट मार्गिकवरील भूमिगत स्थानक आणि वनाझ ते रामवाडी या मार्गिकेवरील उन्नत स्थानक आहे. भूमिगत स्थानक ते उन्नत स्थानक यांना एस्किलेटर आणि लिफ्ट यांनी जोडले आहे.
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाची खोली 33.1 मीटर (108.59 फूट) असून हे भारतातील सर्वांत खोल मेट्रो स्थानक आहे. या भूमिगत स्थानकाचे वैशिष्ट्य म्हणजे या भूमिगत स्थानकाचे छत 95 फूट उंच तेथे थेट सूर्यप्रकाश वा नैसर्गिक प्रकाश पडेल असून अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
हे पण वाचा : शिवाजीनगर – हिंजवडी 23Km मेट्रोच्या कामाला गती; 8,100 कोटींचा निधी, पहा रूट मॅप अन् स्टेशन्स..
या सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाला डेंगळे पूल, कामगार पुतळा आणि पुणे जिल्हा न्यायालय या बाजूंनी प्रवाशांना येण्या – जाण्यासाठी पादचारी व वाहतुकीची सुविधा असणार आहे.
Pune – Pimpri-Chinchwad Metro – रूट मॅप आणि इन्फॉर्मेशन डिटेल्स पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
सिव्हिल कोर्ट ते हिंजवडी ही पुण्यात बांधण्यात येणारी तिसरी मेट्रो मार्गिका पादचारी पुलाने या स्थानकाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक हे मेट्रो झाल्याचे मध्यवर्ती स्थानक म्हणून नावारूपाला येईल. त्यामुळे या स्थानकात 8 लिफ्ट आणि 18 एस्किलेटर प्रवाशांकरिता बसविण्यात येत आहेत.
हे पण वाचा : नाशिक फाटा ते चाकण मेट्रो प्रॉजेक्ट, 16.11Km अंतरासाठी 1548 कोटींचा खर्च; हे असणार 11 स्टेशन्स, पहा रोडमॅप..
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी मेट्रो भवनचे काम करण्यात येणार आहे. संपूर्ण पुणे मेट्रोचे प्रशासन या मेट्रो भवन येथील कार्यालयातून होणार असल्याचे दीक्षित यांनी नमूद केले आहे.