Take a fresh look at your lifestyle.

भारतातली पहिली 500Km रेंजवाली इलेक्ट्रिक स्कुटर ! किंमतही OLA, iQube पेक्षा स्वस्त, फक्त 499 रुपयांत करा बुक..

0

2023 वर्ष संपल्यानंतर आता 2024 मध्ये ईव्ही सेक्टर तेजीत येणार आहे. कारण या वर्षी अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहेत, ज्यामध्ये एकापेक्षा एक फीचर्स पाहायला मिळणार आहेत. 

दरम्यान, भारतीय EV क्षेत्रात, Rivot Motors ने EV मार्केटमध्ये Rivot NX100 नावाची शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे, जी आत्तापर्यंची सर्वात जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कुटर ठरली आहे. या स्कुटरने रेंजच्या बाबतीत ओला आणि सिंपल वन सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरलाही मागे टाकलं आहे.

Rivot NX100 इलेक्ट्रिक स्कूटर ! पॉवरफुल फीचर्सचा पॅक..

आज प्रत्येकजण अशा इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात आहे, जी एका चार्जवर हाय रेंज देण्यास सक्षम असेल. हे लक्षात घेऊन, Rivot NX100 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आली आहे, जी एका चार्जमध्ये तब्बल 500 किलोमीटरपर्यंतचे अंतर कव्हर करू शकते..

कंपनीने क्लासिक, प्रीमियम, एलिट, स्पोर्ट्स आणि ऑफलँडर सारखे 5 पॉवरफुल व्हेरियंट लॉन्च केले आहेत, जे ईव्ही क्षेत्रात स्प्लॅश करण्यासाठी सज्ज आहेत. लोकांना त्याचा जबरदस्त लुक आणि उत्कृष्ट डिझाइनही आवडले आहे..

या व्हेरियंटमध्ये हाय रेंज उपलब्ध 

कंपनीने प्रत्येक व्हेरियंट वेगवेगळ्या रेंजसह लॉन्च केले आहे. क्लासिक व्हेरियंटमध्ये, 100 किमीची रेंज दिली आहे, तर प्रीमियम आणि एलिट, स्पोर्टमध्ये तुम्हाला 200 किमीपर्यंतची रेंज मिळेल.

जर आपण ऑफलेंडर व्हेरियंटबद्दल बोललो तर, त्याची रेंज 300 किलोमीटरपर्यंत आहे आणि अतिरिक्त बॅटरी पॅकसह, ती 200 किलोमीटर अधिक धावू शकते. म्हणजेच एकाच वेळी तुम्ही 500 किलोमीटरचा प्रवास सहज करू शकते. यामध्ये कंपनीने एक्स्ट्रा बॅटरीचा पर्यायही दिला आहे..

फक्त 499 रुपयांमध्ये करा बुक..

तसे, तुम्ही या सर्व इलेक्ट्रिक स्कूटर्स कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून फक्त ₹ 499 च्या टोकन रकमेसह बुक करू शकता. यामध्ये तुम्हाला स्मार्ट फीचर्सचे कॉम्बिनेशन पाहायला मिळते.

बुकिंग करण्यासाठी :- इथे करा क्लिक

Leave A Reply

Your email address will not be published.