Take a fresh look at your lifestyle.

जगातला सर्वात लांब Sea Link महाराष्ट्रात! 52Km अंतरासाठी 64,000 कोटींचा खर्च, या 4 जिल्ह्यांचा प्रवास होणार सुपरफास्ट..

0

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मुंबई वर्सोवा – विरार सी लिंकचा पालघरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. विस्तारित मार्गाचा अहवाल तयार करण्याचे सुरू झाले असून त्यासाठी सल्लागार समितीच्या निवडीसाठी निविदा काढण्यात आल्या आहे. तसेचप्रकल्पाचा प्रस्तावित खर्च दुप्पट झाल्याने त्या खर्चाचे पुनरावलोकन करण्यासंबंधीची निविदाही नव्याने काढण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वीपर्यंत या सी – लिंकच्या बांधकामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (MSRDC) होती. परंतु सरकारने वर्सोवा – विरार सी लिंकच्या बांधकामाचे काम MSRDC कडून MMRDA कडे दिले आहे. मुंबईतील तिसऱ्या – सी लिंकचे बांधकाम वर्षअखेरीस सुरू करण्याची एमएमआरडीएची योजना आहे.

प्रकल्पाचा वाढीव खर्च..

शासनाने या प्रकल्पासाठी यापूर्वी 32 हजार कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु बांधकामास विलंब झाल्याने तब्बल 8 हजार कोटींची वाढ होऊन 40 हजार कोटी रुपये झाली केली, परंतु ‘MSRDC’ने संबंधित प्रकल्पाच्या व्यवहार्यता सल्ल्याबाबत मेसर्स पेंटॅकल – सेमोसा या कंपनीची नियुक्ती केली. या कंपनीने प्रकल्पाची किंमत तब्बल 63 हजार 426 कोटी रुपये निश्चित केली. आता या प्रकल्पाच्या पालघरपर्यंत विस्तार करण्यासाठी पुन्हा नव्याने ‘समवयस्क पुनरावलोकन’ करण्यासाठी पुन्हा नव्याने निविदा काढली आहे.

देशातला सर्वात मोठा Sea Link महाराष्ट्रात होणार..

तब्बल 42.75 किलोमीटर लांबीचा हा सागरी सेतू देशातील पहिला असणार आहे. या सागरी सेतूला चारकोप, मिरा – भाईंदर, वसई – विरार, या चार ठिकाणी या जोडणी दिली जाणार असून या रूटवर विशेष रॅम्प व मार्गिका उभी करण्यात येणार आहे. त्यामुळे या सेतूची एकूण लांबी 52 किलोमीटरपर्यंत वाढणार आहे.

या खेरीज हा सागरी सेतू मुंबई – अहमदाबाद महामार्गालाही कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे. या प्रोजेक्टसाठी मेसर्स पेंटॅकल – सेमोसा या कंपनीने तब्बल 63 हजार 426 कोटींचा खर्च सांगितल्याने आता या प्रकल्पाच्या मोठ्या मास्टर प्लॅनचा आराखडा संबंधित सल्लागाराला तयार करावा लागणार आहे.

तिसरा Sea Link..

वर्सोवा ते पालघर हा सी लिंक मुंबईचा तिसरा लिंक असेल. MSRDC ने 2010 मध्ये वांद्रे आणि वरळी दरम्यान 5.6 किमी लांबीचा सी लिंक बांधला आहे. या पुलावरून दररोज हजारो वाहने ये- जा करतात. वांद्रे ते वर्सोवा दरम्यान 17 किमी लांबीच्या सी लिंकचे बांधकाम सुरू आहे. 8 लेन सी लिंकच्या उभारणीसाठी 11 हजार 332 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तिन्ही सागरी मार्ग एकमेकांशी जोडण्याची सरकारची योजना आहे..

सुविधेची घेतली काळजी..

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने तिसरा सी लिंक दोन टप्प्यात बांधण्याचा निर्णय घेतला आहे. फेज- 1 मध्ये वर्सोवा ते वसई आणि फेज – 2 मध्ये वसई ते विरार अशी योजना होती, ती आता पालघरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. वाहनचालकांची सोय लक्षात घेऊन संपूर्ण मार्गावर चार कनेक्टर तयार करण्यात येणार आहेत. पुलाच्या बांधकामामुळे प्रवासाचा वेळ निम्म्याहून कमी होणार आहे..

रिंग रूट :-

संपूर्ण MMR प्रदेशाला जोडण्यासाठी रिंग रूट तयार करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. याअंतर्गत शिवरी – वरळी कनेक्टर, शिवरी – न्हावासेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, विरार अलिबाग कॉरिडॉर, वसई-भाईंदर पूल, कोस्टल रोड, वर्सोवा – वांद्रे सी लिंक आणि वांद्रे – वरळी सी लिंक जोडण्यात येणार आहेत. रिंग रूट लक्षात घेऊन या पुलाचे नियोजनही करण्यात आले आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.