जिल्ह्यात यंदा पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याने रब्बी पेरणी कमी झाली. अशात हरभरा पिकावर विविध किडी व रोगाचा प्रादूर्भाव वाढीस लागला. या पार्श्वभुमीवर कृषी विभागाकडून शेत बांधावर जावून पिक पाहणी करुन शेतकऱ्यांनी हरभऱ्यावरील किडी व रोगाचे व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला.
वर्षात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 670.79 मि.मी. झाल्यामुळे सरासरी पेरणी क्षेत्र 60 हजार 843 हेक्टर झाली यापैकी आजअखेर प्रत्यक्ष हरभरा पिकाची पेरणी 42 हजार 309 हेक्टरवर झाली आहे. म्हणजेच सरासरी पेरणी क्षेत्राच्या 69 टक्के झाली आहे. २५ नोव्हेंबर पासुन जिल्हयात सतत ढगाळ वातावरण व कमी अधिक प्रमाणात पाऊस असल्यामुळे हरभरा पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे.
हरभरा पिकावर मुख्यतः मर रोग आढळुन येत आहे फ्युजारियम ऑक्सीस्पोरीयम या बुरशीमुळे हा रोग येत असुन सुरुवातीला पाने पिवळी पडून कोमेजतात व शेंडे मलुल होऊन झाड हिरव्या अवस्थेत वाळते मर रोगाचे नियंत्रणाकरीता ठोस उपाय नसला तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन रोग प्रतिबंधक जातीचा वापर व पेरणीपूर्वी बियाण्यास टायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे बिजप्रक्रिया किंवा पेरणीनंतर लगेचच हेक्टरी 10 किलो ट्रायकोडर्मा जमीनीत मिसळुन दिल्यास रोगाचा प्रसार होण्यास प्रतिबंध होऊ शकतो.
तसेच मुळकुज हा रायझोक्टोनिया बटाटाकोला या होणारा रोग आहे. रोपाची पाने बुरशीमुळे पिवळी पडून रोपे कोमेजतात. रोप उपटुन पाहील्यास मुळे सडलेली दिसतात, राम सहजपणे निघून येते. या रोगाच्या नियंत्रणाकरीता जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे बिजप्रक्रिया करण आहे.
पिकाच्या आवश्यकतेनुसारच ओलित करावे. हरभरा पिकास जास्त पाणी झाल्यास किंवा पाणी किंवा पाणी साचन राहील्यास राहील्यास मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पिकांमध्ये डवरणी, निंदणी करुन शेतात हवा खेळती ठेवल्यास पिकांची वाढ चांगली होते.
हरभरा आवश्यक द्विदलवर्गीय पिक असल्यामुळे या पिकांच्या मुळावर गाठी असतात. त्यामुळे हवेतील नत्र शोषण करुन पिक स्वतःची गरज भागवत असल्यामुळे या पिकास यूरोयामधून नत्र मात्रा देऊ नये. पिकांचे एकत्रित एकात्मीक अन्नद्रव्य, किड व रोग व्यवस्थापन करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा यांनी केले आहे.
हरभरा पिकावरील किडी नियंत्रणाचे उपाय..
हरभऱ्यावरील घाटेअळी ही किड बहुभक्षी असुन सुरुवातीच्या काळात पानावरील आवरण खरडुन खातात, नंतर अळी कळ्या व फुले कुरतडुन खाते. एक अळी साधारणत: 30 ते 40 घाटयाचे नुकसान करते. या अळीच्या व्यवस्थापनासाठी सुरुवातीच्या काळात 5 टक्के निंबोळी अकार्ची फवारणी करावी. हेक्टरी 20 पक्षी थांबे उभारावे. जास्त प्रादुर्भाव आढळुन आल्यास इमामोक्टीन बेन्झोएट 5 एस.जी., 3 ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रेनिपॉल 18.5 एस. जी. 2.5 मी.ली. 10 लीटर पाण्यात घेऊन फवारावे.