संपूर्ण राज्याच्या बहुतांश भागात रेल्वेचे जाळे पसरले आहे. त्यामुळे मुरबाडच्या रेल्वे प्रकल्पाला गती कधी मिळणार, तसेच प्रत्येक केंद्राच्या अर्थसंकल्पात मुरबाड रेल्वेचा प्रकल्पाला स्थान मिळत नव्हते परंतु केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी गेली दोन – तीन वर्षे सतत रेल्वेच्या प्रकल्पासाठी केंद्रात पाठपुरावा सुरू केला.
अखेर 1 फेब्रुवारी 2024 चा अर्थसंकल्पात यंदा स्थान मिळाले असून, कल्याण -उल्हासनगर मार्गे – मुरबाड या 28 किलोमीटर लांबीच्या रेल्वे प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाने 726 कोटी 45 लाख निधी मंजूर केला आहे. यामुळे मुरबाडकरांचे 70 वर्षांचे स्वप्न साकार होणार आहे, कोणत्याही परिस्थितीत मुरबाड रेल्वेचा प्रकल्प पूर्ण होईल, अशी ग्वाही खा. कपिल पाटील यांनी दिली.
मुरबाडकरांच्या मागणीनुसार, केंद्रीय पंचायत मंत्री कपि पाटील यांन दिलेला शब्द पाळत कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्प मंजूर केला. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे अवघ्या महिन्याभरात सर्वेक्षण पूर्ण होणारा हा देशातील पहिला रेल्वे प्रकल्प ठरला होता.
नंतर या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या शेतकऱ्यांनाही कोणत्याही परिस्थितीत जमिनी अभावी प्रकल्पाचे काम थांबणार नाही, अशी स्वागतार्ह भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या जमिनीला रेडीरेकनरनुसार कमी भाव मिळत आहे. यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याबरोबर रेल्वे अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात दोनवेळा बैठक झाली.
त्यानंतर शेतकऱ्यांना सन्मानजनक किंमत देण्याच्या सूचना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानव यांनी केल्या आहेत, अशी माहिता कपिल पाटील यांनी दिली.
मुरबाड रेल्वे प्रक्रियेसाठी तरतूद झाली होती. मात्र, हा प्रकल्प सुरू न झाल्यामुळे प्रकल्पाचे अर्थसंकल्पात 10 कोटी 36 लाखांची तरतूद झाली आहे. प्रकल्पासाठी अर्थसंकल्पातून वाढीव रक्कम मंजूर करता येते. दुसऱ्या वर्षी हेड तयार केल्यामुळे हा प्रकल्प रेल्वेच्या यादीत असल्याच स्पष्ट होत आहे.
कल्याण मुरबाड रेल्वे मार्गात बोगदे उभारण्यात येणार आहेत त्यातील सर्वात मोठा बोगदा 850 मीटरचा असणार आहे.
सध्या मध्य रेल्वे ठाणे ते कल्याण मार्गावर पारसिकचा बोगदा आहे. आता मुरबाड मार्गावर बोगदा तयार करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाने या रेल्वेसाठी 726 कोटी 45 लाख निधी मंजूर केला आहे. या खर्चाची 50 टक्के खर्च राज्य सरकार उचलणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अशी असेल मुरबाड – कल्याण रेल्वे..
मुरबाड रेल्वे मार्गावर तीन मोठे पूल उभारण्यात येणार
39 छोटे पूल 5 उड्डाणपूल 10 भुयारी मार्गिका..