ब्रेकिंग : PM Kisan च्या 11व्या हप्त्याची डेट झाली फिक्स ; ‘या’ दिवशी PM मोदी हप्ता करणार रिलीज…

0

ॲग्रो – मराठी टीम, 27 मे 2022 :- PM Kisan 11th Installment releasing Date : PM Kisan च्या 11व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी शिमला येथून देशातील शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता जारी करणार आहेत.

PM Kisan योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांकडून वसुली करून त्यांची नावे यादीतून वगळण्याची प्रक्रियाही सुरू आहे. अशा परिस्थितीत, PMकिसान 2022 च्या नवीन यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही ? हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.

ते तपासण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून घरबसल्या तुमच्या गावाची यादी पाहू शकता. त्याबद्दल माहिती खाली दिली आहे.

पीएम किसान योजनेचे लाभार्थी 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हजार कोटी रुपये एकाच वेळी जमा होणार आहे. खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांची खरिपाची पेरणी करण्यासाठी 50 रुपये प्रतिक्विंटल मिळून त्यांची सोय होणार आहे. PM Kisan Sanman Nidhi च्या 11व्या हप्त्याशी संबंधित माहितीसाठी, ‘शेतीशिवार’ ची ही पोस्ट नक्कीच वाचा…

पीएम किसान योजनेंतर्गत, केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे 6 हजार रुपयांची आर्थिक मदत करते. ही योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत 11.5 कोटी शेतकऱ्यांना 10 हप्त्यांमध्ये 1.81 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. आता 11 व्या हप्त्याची रक्कम 31 मे रोजी हस्तांतरित केली जाईल. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी याला दुजोरा दिला आहे.

केंद्रीय कृषिमंत्री तोमर नुकतेच मध्य प्रदेशमध्ये आयोजित केलेल्या कृषी कार्यक्रमात सहभागी झाले होते, ज्यामध्ये त्यांनी माहिती दिली की, किसान योजनेचा 11 वा हप्ता 31 मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते जारी केला जाणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही योजना सुरू केली होती. सरकारने यापूर्वी 1 जानेवारी 2022 रोजी 10 व्या हप्त्याची रक्कम हस्तांतरित केली आहे.

पीएम किसान अपडेट : e-KYC शिवाय मिळणार नाही लाभ :-

पीएम किसान सन्मान निधीमधील फसवणूक रोखण्यासाठी सरकारने आता e-KYC अनिवार्य केली आहे. शेतकरी दोन प्रकारे e-KYC सी करू शकतात. शेतकरी नागरिक सेवा केंद्र (CSC) ला भेट देऊन किंवा त्यांच्या मोबाईल आणि संगणकाद्वारे e-KYC करू शकतात. जर शेतकऱ्यांनी नागरिक सेवा केंद्र (CSC) द्वारे e-KYC केले तर त्यांना त्यासाठी शुल्क भरावे लागेल.

जर शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून e-KYC केले तर त्यांच्यासाठी ही सुविधा मोफत आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने e-KYC ची अंतिम तारीख 31 मे 2022 पर्यंत वाढवली आहे. जर शेतकऱ्याने अजूनही e-KYC केली नाही तर तो पीएम किसान सन्मान निधीच्या हप्त्याला मुकू शकतो…

तुमच्या गावाची यादी खालील स्टेप्स फॉलो करून तपासा…

सर्वप्रथम तुम्ही https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
येथे भारताचा नकाशा Payment Success टॅबखाली दिसेल.
या खाली Dashboard लिहिलेलं असेल, त्यावर क्लिक करा.
त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल.
हे Village Dashboard चे पेज आहे, येथे तुम्ही तुमच्या गावाची संपूर्ण माहिती मिळवू शकता…
आधी राज्य निवडा, मग तुमचा जिल्हा, मग तहसील आणि मग तुमचे गाव.
त्यानंतर Show बटणावर क्लिक करा.
यानंतर, तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा, संपूर्ण डिटेल्स तुमच्यासमोर ओपन होईल.
Village Dashboard च्या तळाशी चार बटणे दिसतील, किती शेतकऱ्यांचा डेटा पोहोचला हे जाणून घ्यायचे असेल, तर Data Received वर क्लिक करा ज्यांचे पैसे पेंडिंग आहेत त्यांनी दुसऱ्या बटणावर क्लिक करा…

e-KYC ऑनलाईन कशी पूर्ण कराल ?

शेतकरी बांधव Android मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या मदतीने e-KYC करू शकतात. ऑनलाइन e-KYC साठी, तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील….
सर्वप्रथम, तुम्हाला पीएम किसान https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटवर जावं लागेल..

येथे ‘Farmers Corner’ मध्ये, e-KYC च्या ऑप्शनवर क्लिक करा.

आता जे पेज उघडेल त्यात आधार क्रमांकाची माहिती दिल्यानंतर सर्च टॅबवर क्लिक करा.

यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल.

त्यानंतर सबमिट OTP वर क्लिक करा आणि ओटीपी टाकून सबमिट करा. अशा प्रकारे तुमची ऑनलाइन eKYC प्रक्रिया पूर्ण होईल.

पीएम किसान सन्मान निधी योजनामध्ये अर्जासाठी पात्रता :-

देशातील अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन आहे तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील. ग्रामीण आणि शहरी भागातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेत काही बदल केले आहेत. यानुसार, पीएम किसान सन्मान निधीचा लाभ फक्त त्याच शेतकऱ्याला मिळेल, ज्याच्या नावावर शेताची कागदपत्रे असतील. म्हणजेच वडिलोपार्जित जमिनीत पूर्वीप्रमाणे वाटा असलेल्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही…

पीएम किसान लाभार्थी स्थिती अशी तपासा :-

तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ वेबसाइटला भेट द्या.
यानंतर वेबसाईटच्या होमपेजवर ‘Farmers Corner’ वर क्लिक करा.
त्यानंतर ‘Beneficiary Status‘ या ऑप्शन वर क्लिक करा.
आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक येथे टाका.
यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल…

Leave A Reply

Your email address will not be published.