KCC : किसान क्रेडिट कार्ड मिळवणं झालं आणखी सोपं ; आता फक्त ही 3 कागदपत्रे द्या, एक फॉर्म भरा अन् तात्काळ मिळवा 3 लाखांचं कर्ज…
शेतीशिवार टीम, 24 जून 2022 : सध्या सगळीकडं खरीप हंगामाची तयारी सुरु झाली असून शेतकरी आपापल्या कामात गुंतलेले आहे. राज्यातील सुशिक्षित तरुण-तरुणी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांना खरीप हंमागासाठी दर्जेदार खते, बी-बियाणे / खते / शेतीच्या मशागतीच्या लागणारा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सरकारने KCC कार्ड सुरु केलं असून यामधून तुम्ही 3 लाखांचे कर्ज मिळवू शकता…
आता हेच किसान क्रेडिट कार्ड (KCC) मिळवणं आता केंद्र सरकारने आणखी सोपं केलं आहे.जेणेकरून शेतकऱ्यांना स्वस्त दरात शेती व मशागतीसाठी पैसे उपलब्ध होतील. सावकारांच्या तावडीत न पडता आता तुम्ही पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेत असाल तर ते बनवणं आणखी सोपं झालं आहे. कारण सरकारने यापूर्वीच आधार, बँक खाते क्रमांक आणि जमिनीच्या रेकॉर्डची पडताळणी केली आहे.
आता तुम्हाला KCC घेण्यासाठी फक्त तीन कागदपत्रे द्यावी लागतील आणि फक्त एक पानाचा फॉर्म भरावा लागेल. जर अर्ज भरलेला असेल, तर तो स्वीकारल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत, संबंधित बँकेला तुमचे किसान क्रेडिट कार्ड KCC बनवावेच लागणार आहे. तसे न केल्यास अर्जदार शेतकरी बँक अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारही करू शकणार आहे.
अर्जासोबत तुम्हाला फक्त ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि शेतीचे रेकॉर्ड म्हणजे 7/12 8 A आवश्यक कागदपत्रे म्हणून द्यावी लागणार आहे. याशिवाय पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, याशिवाय कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याचे शपथपत्र द्यावे लागणार आहे.
राज्य सरकारनेही जिल्हास्तरीय, विभागीय स्तरावर हंगामपूर्व बैठका घेऊन संबंधित यंत्रणांना मार्फत बँक अधिकाऱ्यांना गावोगावी कॅम्प लावून किसान क्रेडिट कार्ड (KCC) बनवण्याचे आदेश दिले आहेत. तुमच्या गावातही तुम्ही झालेल्या शिबिरात भाग घेतला नसेल तर PM किसान वेबसाइटच्या Farmer’s Corner वरून लगेच KCC फॉर्म डाउनलोड करा भरा आणि तीन आवश्यक कागदपत्रे जोडून बँकेत जमा करा…
KCC साठी आवश्यक कागदपत्रे :-
ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स / आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / आणि पासपोर्ट यापैकी एक..
पत्ता पुरावा म्हणून ड्रायव्हिंग प्रूफ आणि आधार कार्ड यापैकी एक
तुम्ही शेतकरी असल्याचे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला महसूल नोंदी (Revenue records) द्याव्या लागतील.
रीतसर भरलेला अर्ज
इतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलं नसल्याचे शपथपत्र.
KCC कार्ड कोण घेऊ शकतो, अर्ज कुठे असेल ?
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे की, कृषी, पशुपालन आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित कोणतीही व्यक्ती KCC चा लाभ घेऊ शकते. सामूहिक शेती, पट्टेदार, वाटेकरी आणि बचत गट देखील लाभ घेऊ शकतात. शेतीसाठी 3 लाख रुपये मिळणार आहेत. तर मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धनासाठी 2 लाख रुपये कर्ज म्हणून मिळेल. सर्व सरकारी, खाजगी, सहकारी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकाकडून तुम्ही कार्ड बनवू शकता…
विना गॅरंटी मिळेल 1.60 लाखांचं कर्ज :-
तुम्ही KCC मार्फत 3 लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास तुम्हाला जमिनीची हमी (Land guarantee) द्यावी लागेल. पण जर तुम्ही फक्त 1.60 रुपयांचे कर्ज घेत असाल तर या रकमेवर गॅरंटीची गरज भासणार नाही. 3 लाख रुपयांच्या कृषी कर्जासाठी 9% व्याजदर आहे. यामध्ये सरकार 2% सूट देते. जर तुम्ही वेळेवर पैसे परत करत असाल तर आणखी 3% सूट मिळेल.
एकंदरीत, जे पैसे वेळेवर परत करतात त्यांना फक्त 4% व्याज द्यावं लागेल. पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळावा, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे.