शेतकऱ्यांचा कल आता ट्रॅक्टरकडे वाढला आहे. या पार्श्वभूमीवर 2022 – 23 मध्ये जिल्ह्यातील 215 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यासाठी जिल्ह्यातून 5 हजार 649 शेतकऱ्यांनी अर्ज केला होता. शासनाच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना एक लाखाची तर मागासवर्गीय, दिव्यांग, महिला, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सव्वा लाख रुपयाची सबसिडी दिली जाते, उर्वरित पैसे हप्त्याने संबंधित ट्रॅक्टर कंपनीला शेतकरी भरतात.
खतांबरोबरच आता शेती मशागतीचा खर्च महागला त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ट्रैक्टर खरेदीकडे वाढला असून गतवर्षी साडेपाच हजार शेतकऱ्यांचे अर्ज पाहायला मिळाले आहेत. त्यांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह रोटावेटर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र, हार्वेस्टर, प्लाऊ, दालमिल, राइस मिल, स्प्रे पंप, रोवणी यंत्र तसेच शेतीशी निगडीत साहित्यांचा सबसिडीवर लाभ दिला जातो.
शेतीचे तुकडे आणि मशागतीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांकडुन शासनाच्या अनुदानातील ट्रॅक्टरची मागणी वाढली आहे. दोन महिन्यांत भंडारा जिल्ह्यातील तब्बल 1030 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अनुदानातील ट्रॅक्टरसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी 523 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळाला आहे.
ट्रॅक्टर अनुदानाकरता अर्ज करण्यासाठी..
त्या तुलनेने चालू आर्थिक वर्षात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. शेतीचे तुकडे आणि बैलजोडी सांभाळण्यास परवडत नसल्याने बैलांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. गावातील बहुतेक शेतकऱ्यांकडे असलेली बैलजोडी आता काही मोजक्या शेतकऱ्यांकडेच पाहायला मिळते.
लाभ घेण्यासाठी काय करावे ?
कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. शेतकऱ्यांनी योजनांच्या लाभासाठी अर्ज केला की, त्याला लाभ मिळेपर्यंत पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. तसेच अर्ज केल्यानंतर ऑनलाइन लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येते. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून योजनेचा लाभ घेता येतो.
जिल्ह्यात दोन वर्षांत मिळाले 40 हार्वेस्टर..
ट्रॅक्टरसह हार्वेस्टर शेतीसाठी अत्यंत उपयोगी साधन आहे. मजुरीचे वाढते दर लक्षात घेता बहुतांश शेतकारी हार्वेस्टरच्या साहाय्याने मळणी करतात. त्यामुळे वेळ व पैशाची बचत होते. 2021-22 आणि2022-23 या दोन वर्षात जिल्ह्यातील 40 शेतकऱ्यांनी हार्वेस्टरचा लाभ घेतला आहे. यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना आठ ते अकरा लाखांपर्यंत सबसिडी देण्यात येते.
Combine Harvester साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी..
कोणाला किती मिळतो लाभ ?
या योजनेत सर्वसाधारण गटातील दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असणाऱ्या पुरुष लाभार्थ्यांना एक लाखापर्यंत सबसिडी दिली जाते. तर अल्प, अत्यल्प, महिला, एससी, एसटी व इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 1 लाख 25 हजारांपर्यंत सबसिडी दिली जाते.
कडबा कुट्टी, पॉवर टिलर, ट्रॅक्टर ट्रॉलीकरता अर्ज करण्यासाठी