Pune Ring Road : रिंगरोडसाठी पश्चिम मार्गावरील भूसंपादन पूर्ण ! ‘या’ 31 गावांसाठी 3,000 कोटींचा निधी वितरित, पहा यादी..

0

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) प्रस्तावित वर्तुळाकार रस्ता (रिंगरोड) प्रकल्पातील पश्चिम मार्गावरील 34 गावांपैकी 31 गावांमधील 644 हेक्टर जमिनीचे भूसंपादनाचे काम झाले आहे. 2 हजार 975 कोटींचा निधी वितरीत केला आहे.

भोर तालुक्यातील पाच गावे वगळून शिवरे गावाचा समावेश झाला असून संबंधित गावांतील मुल्यांकनाचे दर निश्चिती सुरू आहे. तोपर्यंत पूर्व भागावरील हवेली, मावळ, खेड आणि पुरंदर येथील जमिनीच्या भूसंपादनाबाबत जिल्हा प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी रिंग रोड संदर्भातील कामकाजासंदर्भातील आढावा बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे, एमएसआरडीसीचे अप्पर जिल्हाधिकार हणुमंत अरगुंडे, पूर्वेकडील भोर, हवेली खेड आणि पुरंदर तालुक्यांचे प्रांत अधिकारी, तहसीलदार, अधिकारी उपस्थित होते. यावेळी पुलकुंडवार यांनी तातडीने पूर्वेकडी गावांमध्ये नोटीस बजावून भूसंपादन करण्यास सुरुवात करावे, असे आदेश दिले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीन एमएसआरडीच्या माध्यमातून 172 किमी. लांबी आणि 110 मीटर रुंदीचा रिंग रोड सारखा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

दोन टप्प्यात हा प्रकल्प राबविण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात पश्चिम मार्गावर भोरमधील 5, हवेलीतील 11 मुळशीतील 15 आणि मावळातील 6 गावांचा समावेश असून एकूण 650 हेक्टर जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु, पुणे संभाजीनगर हरित मार्ग (ग्रीन कॉरिडॉर) भोर तालुक्यातील कांजळे , कोळवडे , खोपी , कांबरे आणि नायगाव या पाच गावातून जात असल्याने त्यातील तीन गावे वगळून शिवरे गावाचा समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे क्षेत्रफळ कमी होत नव्याने समाविष्ट गावातील गावातील जमिनीचे दर काढण्यासाठी मुल्यांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पूर्वेकडील टप्यांच्या गावांमध्ये या गावांचे भूसंपादन करण्यात यावे, असे पुलकुंडवार यांनी सांगितले.

पूर्व मार्गावर मावळमधील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील 5 आणि भोरमधील 3 गावांचा समावेश असून खेड तालुक्यातील भूसंपादनाबाबत बाधित गावातील शेतकऱ्यांना नोटीस पाठविल्या आहेत.

खेड मधील स्थानिकांनी भूसंपादनाबाबत मुदतवाढीनुसार एक महिन्याचा कालावधी संपुष्टात येत असल्याने शेतकऱ्यांकडून स्वयंघोषणा पत्र घेण्यास सुरुवात केली आहे. तर उर्वरीत मावळ तालुक्यातील 11 आणि हवेली तालुक्यातील 15 गावांबाबत तातडीने भूसंपादन करण्यासाठी प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

रिंग रोडच्या पश्चिम मार्गावरील 31 गावांचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरीत तीन गावांचे भूसंपादनाबाबत कार्यवाही सुरू असून विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार पूर्वेकडील गावांचे भूसंपादन करताना या तीन गावांचे भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येईल. पूर्व मार्गावरील खेड तालुक्यातील बाधितांकडून तातडीने संमतीपत्र घेण्यास सुरुवात करण्यात आली असून उर्वरीत गावातीन बाधितांना नोटीस पाठविण्यात येईल. –

कल्याण पांढरे, भूसंपादन समन्वय अधिकारी.

Leave A Reply

Your email address will not be published.