Take a fresh look at your lifestyle.

Land Record 1980-2002 : डिजिटल 7/12, 8-A, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करा फक्त 2 मिनिटांत, पहा ॲप लिंक अन् प्रोसेस..

0

महसूल विभागाने संगणकीकृत केलेला आणि महाभूमी संकेतस्थळाद्वारे सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असणारा डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आता केंद्र शासनाच्या उमंग या मोबाइल ॲपवर उपलब्ध होणार आहे. राज्यातील 35 जिल्ह्यांतील 358 तालुक्यांतील 44 हजार 560 महसूली गावांतील दोन कोटी 57 लाख सातबारा उतारे संगणकीकृत करण्यात आले आहेत.

त्यापैकी डिजिटल स्वाक्षरीत 99 टक्क्यांपेक्षा जास्त सातबारा उतारे महाभूमी संकेतस्थळासह आता केंद्राच्या उमंग ॲपवरही उपलब्ध होणार आहेत. सध्या राज्यातील दररोज दीड ते दोन लाख नागरिक या डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा, खाते उतारे आणि मिळकत पत्रिकांचा (प्रॉपर्टी कार्ड) त्यांच्या कार्यालयीन, न्यायालयीन कामकाजासाठी वापर करत आहेत.

आतापर्यंत महाभूमी संकेतस्थळावरून डिजिटल स्वाक्षरीतील साडेपाच कोटी अभिलेख डाऊनलोड करण्यात आले आहेत. त्यापोटी 105 कोटी 72 लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे.

महाभूमी संकेतस्थळावर सध्या 22 लाख नोंदणीकृत वापरकर्ते या सेवांचा लाभ घेत आहेत. यापूर्वी नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उताऱ्याची प्रत मिळविण्यासाठी महा ई सेवा केंद्रांचा आधार घ्यावा लागत होता. आता फक्त उमंग मोबाईल ॲपमधून एका क्लिकवर हे मिळू शकणार आहेत.

दरम्यान, डिजिटल सातबारा उतारा प्रत्येकी 15 रुपये भरून कोठूनही आणि केव्हाही उपलब्ध झाला आहे. त्यासाठी महसूल विभागाचे महाभूमी हे संकेतस्थळ आणि केंद्र शासनाच्या उमंग या मोबाइल अपवर उपलब्ध होणार आहे. हे ॲप गुगल प्ले – स्टोअरवर उपलब्ध करून दण्यात आल आहे. अशा माहिती जमाबंदी आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.

कोणते दस्तऐवज किती रुपयांना उपलब्ध.. . 

स्वाक्षरीयुक्त सातबारा :- 15 रुपये
आठ – अ :- 15 रुपये
स्वाक्षरीयुक्त फेरफार :- 15 रुपये
मिळकत पत्रिका ग्रामीण :- 45 रुपये

उमंग ॲपवरून सातबारा 7/12 उतारा कसा डाउनलोड करा.

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर ओपन करावे लागेल..

आता तुम्हाला सर्च बॉक्समध्ये उमंग ॲप टाइप करावे लागेल.

यानंतर तुम्हाला सर्च ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्या स्क्रीनवर एक यादी उघडेल.

तुम्हाला या यादीतील सर्वात वरच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता तुम्हाला इंस्टॉल करून पर्यायावर क्लिक करावे लागेल.

अशा प्रकारे तुम्ही उमंग ॲप डाउनलोड करू शकाल.

उमंग ॲप रजिस्ट्रेशन प्रक्रिया..

सर्वप्रथम तुम्हाला उमंगच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागेल.

आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

मुख्यपृष्ठावर, तुम्हाला लॉगिन / नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.

या पेजवर तुम्हाला create account या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.

या पेजवर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि get OTP या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता तुम्हाला OTP बॉक्समध्ये OTP टाकून कॅप्चा कोड टाकावा लागेल.

यानंतर तुम्हाला रजिस्टरच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकाल..

उमंग ॲप लिंक :- UMANG

स्टेप 1 : मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला प्ले स्टोअर मधून उमंग अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे. व नंतर ओपन करायचे आहे. अँप ओपन झाल्यावर तुम्हाला काही परमिशन्स विचारल्या जातील त्या allow करायच्या आहेत.

स्टेप 2 : आता अँप च्या होम पेज वर तुम्हाला Welcome to Umang मध्ये Register/LogIn असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. व नंतर काही परमिशन द्यायच्या आहेत.

स्टेप 3 : त्या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला लॉगिन करायचे आहे. इथे जर तुमचे आधीच उमंग अँप वर अकाउंट असेल तर डायरेक्ट तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी च्या सहाय्याने लॉगिन करू शकता. किंवा जर अकाउंट नसेल तर तुम्हाला खाली New on Umang? Register here असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे

व अकाउंट तयार करायचे आहे. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाकून एक पिन तयार करायचा आहे व तुमचे अकाउंट तयार होऊन जाईल. व लॉग इन करायचे आहे.

स्टेप 4 : मित्रांनो, लॉगिन केल्या नंतर नेक्स्ट पेज वर All Services वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 5 : नंतर सर्च ऑपशन वर जाऊन Aaple Sarkar सर्च करून त्यावर क्लिक करायचे आहे.

स्टेप 6 : त्या नंतर नेक्स्ट पेज वर महाराष्ट्र सरकार च्या विविध सर्व्हीस तुम्हाला दिसतील, त्यातील थोडे खाली स्क्रोल करून Maharashtra Land Records या ऑप्शन मध्ये Download 7/12 Land Record, Check Your Wallet Balance असे ऑप्शन दिसतील. त्यातील Check Your Wallet Balance या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. कारण सातबारा काढण्यासाठी तुम्हाला काही पैसे भरावे लागणार आहेत. तर या दुसऱ्या ऑप्शन वर क्लिक केल्या नंतर नेक्स्ट पेज वर तुमचा मोबाईल नंबर टाकून Submit / सबमिट करायचे आहे.

स्टेप 7 : मित्रांनो, एक सातबारा काढण्यासाठी तुम्हाला 15 रुपये लागणार आहेत. त्यामुळे आता जर तुमच्या wallet मध्ये झिरो बॅलन्स असेल तर इथे तुम्हाला बॅलन्स ऍड/ Add Balance बटन वर करायचा आहे.

स्टेप 8 : नेक्स्ट पेज वर Pay Now या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 9 : मित्रांनो, पैसे ऍड करताना तुम्ही 15 ते 1000 रुपये ऍड करू शकता. इथे तुम्हाला हवी तेवढी अमाउंट टाकायची आहे व बँकेचे पेमेंट गेटवे सिलेक्ट करून Pay Now ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 10 : आता पुढे डेबिट कार्ड चे डिटेल्स टाकून पेमेंट करायचा आहे.

स्टेप 11 : पेमेंट पूर्ण झाल्यावर, पुढच्या पेज वर तुम्ही ऍड केलेले पैसे Available Balance समोर दिसतील. आत्ता Back to UMANG App बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 12 : आत्ता परत All Services वरती क्लिक करून Download 7/12 Land Records या ऑप्शनवर क्लीक करा.

स्टेप 13 : नेक्स्ट पेज वर आता तुम्हाला ज्या जागेचा सातबारा हवा आहे त्या जागेची काही माहिती भरायची आहे. ज्यात ती जागा असलेला तुमचा जिल्हा, तालुका, गावचे नाव सिलेक्ट करून टाकायचे आहे. व त्या नंतर सर्वे नंबर म्हणजेच ज्याला आपण गट नंबर म्हणतो तो टाकायचा आहे. व नंतर Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 14 : त्या नंतर तुम्हाला Download चा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करून allow बटन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुमच्या समोर तुमचा सातबारा ओपन होईल.

स्टेप 15 : आता याच पेज वर वरती तीन डॉट्स दिसतील त्यावर क्लिक करून डाउनलोड ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. तरच तुमचा सातबारा डाउनलोड होऊन तुमच्या फोन च्या गॅलरी मध्ये सेव्ह होईल.

आता डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उमंग मोबाइल उपयोजनवरून देखील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्याची उपलब्धता अत्यंत सोपी आणि सहज होईल. परिणामी डिजिटल सातबारा उतारा आणि महाभूमी प्रकल्प महसूल विभागाची डिजिटल क्रांती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

– सरीता नरके, राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प..

Leave A Reply

Your email address will not be published.