Take a fresh look at your lifestyle.

1 रुपयांत पीक विमाचा अध्यादेश जारी, या तारखेपर्यंत नोंदणीची मुदत, पहा जिल्ह्यातील तालुकानिहाय पिके अन् विमा रक्कम..

0

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्य शासनाने खरीप हंगामात केवळ एक रुपया भरून पीक विम्याचा लाभ देण्याकरिता सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांनी 31 जुलैपर्यंत नोंदणी करून योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरीप हंगाम 203-24 ते रब्बी हंगाम 2025-26 याकरता सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यास राज्य शासनाने 26 जून रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे.

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, नावीन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, यामुळे उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढीचा हेतू साध्य होण्यास मदत होईल, आदी या योजनेची उद्दिष्ट्ये आहेत.

पुणे जिल्ह्यासाठी योजनेमध्ये समाविष्ट पिके, तालुके, विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर (केंद्र अधिक राज्य आणि शेतकरी हिस्सा पकडून) पुढीलप्रमाणे :

भात –

हवेली, मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव, पुरंदर – प्रतिहेक्टरी 52 हजार 760 रुपये – विमा हप्ता ( शेतकऱ्याचा 1 रुपये हिस्सा पकडून ) 1 हजार 552.80 रुपये.

ज्वारी –

हवेली, भोर, खेड, आंबेगाव – प्रतिहेक्टरी 27 हजार रुपये – विमा हप्ता 1 हजार 860 रुपये.

बाजरी –

हवेली, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर – प्रतिहेक्टरी – 24 हजार रुपये – विमा हप्ता 2 हजार 640 रुपये.

नाचणी –

मुळशी, भोर, वेल्हा, खेड, आंबेगाव – प्रतिहेक्टरी – 20 हजार रुपये – विमा हप्ता – 800 रुपये.

तूर –

शिरूर, बारामती, इंदापूर 35 हजार रु. 7 हजार 350 रुपये.

मूग – उडीद

शिरूर – प्रतिहेक्टरी 20 हजार रुपये विमा हप्ता 5 हजार रुपये.

भुईमूग –

हवेली, मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, पुरंदर – प्रतिहेक्टरी 40 हजार रुपये – विमा हप्ता 3 हजार 200 रुपये.

सोयाबीन –

इंदापूर, जुन्नर, खेड, बारामती, मावळ, आंबेगाव – प्रतिहेक्टरी – 49 हजार रुपये – विमा हप्ता 3 हजार 920 रुपये.

कांदा –

बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर – प्रतिहेक्टरी 80 हजार रुपये – विमा हप्ता – 6 हजार 400 रुपये.

ई- पीक पाहणी आवश्यक

पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्यात यावी. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई – पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास 3- पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार असल्याचं गृह विभागानं सांगितलं आहे.

अर्ज कसा आणि कुठं कराल ?

बँक किंवा वि. का. स. सेवा सोसायटी

सीएससी केंद्र

पीक विमा पोर्टल – https://pmfby.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.