शेतीशिवार टीम, 5 एप्रिल 2022 :- कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे देशातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. अशा परिस्थितीत ज्या नागरिकांनी आपल्या कुटुंबातील कोणताही कमावणारा सदस्य गमावला आहे, त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. हे लक्षात घेऊन सरकारने ‘कोविड कुटुंब आर्थिक सहाय्य योजना’ सुरू केली आहे.

या योजनेद्वारे देशभरातील ज्या नागरिकांना कोरोनाव्हायरस संसर्गामुळे कुटुंबातील सदस्य गमावले आहेत त्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. कोरोनामुळे आई किंवा वडील गमावलेल्या निराधार झालेल्या बालकांना शासनाच्या माध्यमातून 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिलं जाणार असल्याचं महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला असून यासाठी सर्व जिल्ह्यांचे अर्ज सुरु झाले आहे.

हा लेख वाचून तुम्हाला या योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती मिळणार आहे, जसे, त्याचे फायदे, पात्रता, महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इ…तर मित्रांनो, आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा…

20 ऑक्टोबर 2021 रोजी श्वेता ता दाणाणे विरुद्ध केंद्र शासन या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून निराधार झालेल्या बालकांना 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात यावे अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत आणि या निर्णयाच्या अधीन राहून केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रत्येक राज्याला हा निधी वितरित करण्यात आला आहे.

आता राज्य शासनाच्या माध्यमातून आता हा निधी प्रत्येक जिल्हा कार्यालयाला वितरित करण्यात आल्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून हे अर्ज सुरू करण्यात आले आहे.

त्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज देण्यात आलेला असून 3 ते 18 वयोगटातील पात्र असलेल्या बालकांना हा अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे :-

मूळ विहित नमुन्यातील अर्ज
आधार कार्ड
बालक आणि मृत व्यक्तीचा रहिवासी दाखला
आई / वडील कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झाल्याचा दाखला व झेरॉक्स प्रत…
बँक खात्याचा तपशील
पासपोर्ट फोटो
मोबाईल नंबर
बालकाचे शाळेचे बोनाफाईड
शासनाच्या किंवा इतर योजनाचा लाभ घेत नसल्याचे हमीपत्र…

मूळ विहित नमुन्यातील अर्जाची PDF डाउनलोड करण्यासाठी खलीक लिंक वर क्लिक करा.  

विहित नमुन्यातील अर्ज PDF  

अर्ज कुठे कराल ?

पात्र लाभार्थ्यांनी तालुक्यातील तहसीलदार / एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय / जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय मध्ये अर्जाचा विहित नमुना घेऊन आवश्यक कागदपत्रासह व मुळ अर्जासह प्रस्ताव या तीन एका कार्यालयात जमा करावा…

नम्र विनंती :- कोरोनामुळे आई किंवा वडील गमावलेल्या निराधार झालेल्या बालकांना हा निधीतुन त्यांच्या शालेय शिक्षणाला हातभार लागेल, त्यामुळे गावातील सरपंच / उपसरपंच / ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या भागातील मुलांना हा निधी मिळावा यासाठी प्रयत्न करावे… 

धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *