Take a fresh look at your lifestyle.

‘ही’ ठरली भारतातली 1 नंबर SUV ! Creta, Brezza, सहित Seltos लाही दिला धक्का !

0

शेतीशिवार टीम, 4 एप्रिल 2022 :- टाटा मोटर्स (Tata Motors) दर महिन्याला Maruti Suzuki, Hyundai, Mahindra आणि Kia सारख्या कंपन्यांना टक्कर देत आहे. टाटा मोटर्सने मार्च महिन्यात पॅसेंजर व्हायकल सेगमेंटमध्ये एका महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक विक्री ची नोंद केली आहे.

सर्वात जास्त विकल्या गेल्या या Cars…

टाटाने मार्च महिन्यात तब्बल 42293 वाहनांची विक्री केली होती, तर गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने केवळ 29,654 वाहनांची विक्री केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने 43% ची प्रभावी वाढ नोंदवली आहे. कंपनीच्या विक्रीत सर्वाधिक विकली जाणारी SUV म्हणजे टाटा नेक्सॉन (Nexon) (14,315 युनिट्स), पंच (Punch) (10,526 युनिट्स) आणि अल्ट्रोझ (Altroz) (4,727).

जरी अल्ट्रोझला Altroz सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांच्या टॉप 10 लिस्टमध्ये स्थान मिळवता आले नाही, परंतु कंपनीसाठी हे एक अतिशय महत्त्वाचं प्रॉडक्ट आहे. कंपनीने Altroz ​​DCA ऑटोमॅटिक व्हेरिएंट लाँच केल्यामुळे, कंपनी आता येत्या काही महिन्यांत अधिक खरेदीदारांना आकर्षित करेल अशी आशा आहे.

Tata Nexon ने Maruti Brezza ही टाकलं मागे…

Nexon बद्दल बोलायचं झालं तर दर महिन्याला ब्रँडसाठी सर्वाधिक विक्री होणारं हे वाहन ठरलं आहे. या SUV ची क्रॅश टेस्ट रेटिंग, केबिन स्पेस आणि ओव्हरऑल पॅकेजिंग हे लोकांसाठी खरेदीसाठी बेस्ट ऑप्शन बनवते.

टाटा नेक्सॉनने मार्च महिन्यात विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी विटारा ब्रेझालाही (Maruti Brezza) मागे टाकलं असून मार्चमध्ये 12,439 युनिट्सची विक्री झाली आहे. नवी Brezza लाँच केल्यानंतर, ती Nexon कॉम्पॅक्ट SUV ला मागे टाकू शकते का ? ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

टाटा मोटर्सची मोठी कामगिरी :-

Tata Nexon Electric देखील कंपनीसाठी चांगले काम करत आहे, कारण ती भारतातील इलेक्ट्रिक कार खरेदीदारांसाठी पसंतीची निवड ठरत आहे. टाटा मोटर्स हा एकमेव ब्रँड आहे ज्याने गेल्या महिन्यात 3,357 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. टाटा मोटर्ससाठी 2021 हे वर्ष कंपनीसाठी सर्वात यशस्वी वर्ष ठरलं आहे. या वर्षात कंपनीने 67% वाढ नोंदवून 3,70,372 युनिट्सची विक्री केली…

मार्च महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या 10 SUV ची लिस्ट…

Tata Nexon :- 14,315
Maruti Vitara Brezza :- 12,439
Hyundai Creta :- 10,532
Tata Punch :- 10,526

Hyundai Venue :- 9,220
Kia Seltos :- 8,415

Kia Sonet :- 6,871
Mahindra Scorpio :- 6061
Mahindra XUV 700 :- 6040

Leave A Reply

Your email address will not be published.