शेतीशिवार टीम, 4 एप्रिल 2022 :- रेशन कार्ड संदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तुम्ही जर तुमच्या राशन कार्ड वरती धान्य घेत नसाल याचबरोबर तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे पॉस मशीनवर (POS Machine) बायोमेट्रिक केलेलं नसेल. किंवा तुमचा आधार प्रमाणीकरण (Authentication) केलेलं नसेल तर तुमचं राशन कार्ड बंद होऊ शकतं.
तसेच तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन झालेलं नाही त्यांचा आरसीएमएस प्रणाली (RCMS system) वरून नाव कमी होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तींच्या नावे धान्य घेत आहेत ते मिळणं बंद होणार आहे. याबाबत राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या असून याबाबत कारवाईला सुरवातही झाली असून मोहिमा सुरू करण्यात आलेल्या आहेत.
असे बरेच सारे लाभार्थी आहेत, ते आपल्या गावापासून दूर असून ते शहराच्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यांना अद्याप देखील ‘वन नेशन वन रेशन’ ची माहिती नाही, असे लाभार्थी आपलं रेशन घेऊ शकत नाहीत.
काही लाभार्थी असे आहे की, ते बऱ्याच वर्षापासून अनेक आपलं अन्नधान्य उचलत नाहीत किंवा बऱ्याच लाभार्थ्यांनी आपलं स्वस्त धान्य दुकानांमध्ये आधार प्रमाणीकरण केलं नाही किंवा कुटुंब प्रमुखाचं आधार प्रमाणीकरण झालं आहे परंतु कुटुंबातील इतर सदस्यांचे आधार प्रमाणीकरण बायोमेट्रिक झालं नाही
अशा लाभार्थ्यांचं आरसीएमएस (RCMS) वर जे काही लाभार्थी नावे आहेत ती वगळण्यात सुरुवात झाली आहे.
त्यामुळे कुटुंबाला मिळणाऱ्या अन्नधान्याचे प्रमाण कमी होणार आहे. आणि जे लाभार्थी अन्नधान्य उचलतच नाही अशा रेशन कार्ड वरती अन्नधान्याचे वितरण ठिकाणी बंद होणार आहे.
सध्या जिल्हानिहाय ही मोहीम सुरु केली असून पहिल्या टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यामधील जवळपास 14 हजार 911 शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहे, याबाबत शिधा पुरवठा अधिकारी यांनीपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.
त्यामुळे तुम्ही जर शहरापासून गावापासून दूर असाल तरी तुम्ही आपल्या स्वस्त धान्य दुकानाला भेट द्या आणि आपलं अन्नधान्य घ्या. आणि आपलं आधार प्रमाणीकरण बायोमेट्रिक झालेलं नसेल ते पूर्ण करून घ्या. जेणेकरून तुमचं अन्नधान्याचे वितरण बंद होणार नाही. किंवा कुटुंबातील सदस्यांची नावे आहे ही नावं आरसीएमएस प्रणालीवरून वगळली जाणार नाही.