शेतीशिवार टीम 4 एप्रिल 2022: उन्हाळा आता सुरूच झाला आणि मार्केटमध्ये फळांचा राजा अर्थातच आंबा दिसू लागला आहे. खरं तर उन्हाळ्यात आंबा खायला कोणाला आवडत नाही? कारण आंबा हे असेच एक फळ आहे ज्याला केवळ चवीमुळेच नाही तर त्याच्या गुणधर्मामुळे फळांचा राजा म्हटले जाते. काही लोकांना आंबा गोड वाटतो,त्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांना साखर वाढण्याचा धोका जास्त असतो.पण अशा लोकांना हे माहित नसते की आंबा जर योग्य प्रमाणात आणि मर्यादित प्रमाणात खाल्ले तर त्याचे अनेक फायदे होतात.
तर चुकीच्या वेळी आंबा खाल्ल्यानेही नुकसान होऊ शकते.आयुर्वेदानुसार रात्री आंबा खाऊ नये.आणि तुम्हाला माहित आहे का? की आंबा खाल्ल्यानंतर पाच गोष्टी खाणं टाळावं एरवीं अनेक गंभीर आजार तुम्हाला घेरतील.चला तर मग जाणून घेऊया आंबा खाल्ल्यानंतर कोणती फळे खाऊ नयेत.पण त्याआधी आंब्यामध्ये असलेल्या पोषक तत्वांकडेही एकदा नजर टाकली पाहिजे.
आंब्यामध्ये किती पोषण आहे? हेल्थनुसार आंब्यामध्ये बरेच पोषक घटक असतात. यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी-6 असते. आंबा खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. तुम्ही आंबा कच्चा खाऊ शकता किंवा शेक बनवल्यानंतर पिऊ शकता. मँगो शेक देखील तुम्हाला अनेक फायदे देतो. जाणून घेऊया आंबा खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ टाळावेत.
आंबा खाण्याचे अद्भुत फायदे:-
1. आंब्यामध्ये व्हिटॅमिन-सी, फायबर आणि पेक्टिनचे प्रमाण जास्त असते जे हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित करण्यास मदत करते.
2. आंब्यामध्ये क्वेर्सेटिन, फिसेटीन,आइसोक्वेरिट्रिन,एस्ट्रैगलिन,गैलिक एसिड आणि मिथाइल गॅलेट यांसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे सर्व गुणधर्म आपल्या शरीराला ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि ल्युकेमियापासून आपल्याला वाचवतात.
3. आंबा हे टार्टेरिक आणि मॅलिक ऍसिड भरपूर असल्याने आणि त्यात सायट्रिक ऍसिड देखील असते. हे आपल्या शरीरातील क्षार टिकवून ठेवण्यास मदत करते.
आंबा खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा:-
1.आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक घेणं टाळावं:-
आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड्रिंक पिण्याचा विचार करत असाल तर सावधान. आंबा आणि कोल्ड्रिंक एकत्र घेतल्यास पोटामध्ये घातक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते. कारण आंबा आणि कोल्ड्रिंक्स या दोन्हीमध्ये भरपूर साखर असते, ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखर अचानक वाढवून प्रमाणापेक्षा जास्त पातळीपर्यंत वाढू शकते.
2.पाणी:-
आंबा किंवा कोणतेही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे फळ पचायला जास्त वेळ लागतो.त्यामुळे पचनक्रियाही बिघडू शकते. त्यामुळे पोटात गॅस,पोटदुखी किंवा छातीत जळजळ होण्याची समस्याही होऊ शकते.
3.दह्याचे सेवन:-
आंबा खाल्ल्यानंतर लगेच दही खाऊ नये. कारण आंबा आणि दही मिळून पोटात जास्त कार्बन डायऑक्साइड (Carbon dioxide) तयार होतो, ज्यामुळे पोटाचा त्रास उदयास येऊ शकतो.
4.तिखट मसाले असलेले अन्न खाणं टाळावं:-
काही लोकांना रात्रीच्या जेवणात आंबा खायला फार आवडतो. पण ही सवय मोठी चूक ठरू शकते. कारण त्यामुळे छातीत जळजळ किंवा पोट खराब होऊ शकते. त्याच वेळी, त्वचेवरील समस्या देखील उद्भवू शकतात. 5. कारले – आंबा खाल्ल्यानंतर कारले कधीही खाऊ नयेत. कारण असे केल्याने मळमळ, उलट्या, धाप लागणे अशा समस्या उद्भवू शकतात.