शेतीशिवार टीम , 1 एप्रिल 2022 :- MG Motor India ने या महिन्यामध्ये आपली नवीन MG ZS EV हि इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. लॉन्च होताच या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. MG च्या मते, या इलेक्ट्रिक कारला 1 महिन्यापेक्षा कमी कालावधीत 1500 प्री-बुकिंग मिळाले आहे.
हि कार इलेक्ट्रिक असल्याने, ही आकडेवारी देखील चांगली म्हणता येतील. तसेच फेब्रुवारी 2022 मध्ये जुन्या ZS EV च्या फक्त 38 युनिट्सची विक्री झाली होती. विशेष म्हणजे, दोन व्हेरियंटमध्ये येणारी नवीन ZS EV सध्या फक्त एकाच व्हेरियंटमध्ये (Exclusive) बुकिंगसाठी उपलब्ध आहे, ज्याची किंमत 25.88 लाख रुपये Ex-showroom आहे.
लार्ज बॅटरी आणि गुड रेंज :-
MG ZS EV मध्ये मोठी 50.3kWH बॅटरी देण्यात आली आहे. या आधी यात 44.7kWh बॅटरी युनिट मिळत असे. नवीन बॅटरी 143bhp पॉवर आणि 353Nm टॉर्क डिलिव्हर करतं. केवळ 8.5 सेकंदात ही कार 0-100 किमी प्रतितास वेग गाठण्याचा दावा करत आहे. नवीन ZS इलेक्ट्रिकला एका चार्जवर 461km ची रेंज देण्याचा दावा करण्यात आला आहे. जुन्या मॉडेलने पूर्ण चार्ज केल्यावर 419km पोहोचवण्याचा दावा केला होता.
पहिल्या तिमाहीत 69% वाढ :-
2021 च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत 2022 च्या पहिल्या तिमाहीत MG मोटर इंडियाच्या विक्रीत 69% वाढ झाली आहे. कार निर्मात्याने मार्च 2022 मध्ये एकूण 4721 वाहने विकली आणि या काळात Covid-19 आणि जागतिक स्तरावर सेमीकंडक्टर चिप्सची कमतरता यासारख्या समस्यांमुळे पुरवठा आव्हानांना तोंड द्यावे लागले. गेल्या वर्षी मार्चमध्ये या कंपनीने 5,528 मोटारींची किरकोळ विक्री केली होती.