महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्गीयांसाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. या अंतर्गत कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग, विक्री व सेवा आदींचा समावेश आहे. तसेच स्वयंरोजगार किंवा रोजगार प्राप्त करण्याठी ‘कौशल्य विकास प्रशिक्षण योजना’ आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ‘शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना’ महामंडळातर्फे राबविण्यात येतात.

या योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक विशाखा फडणवीस यांनी केले आहे. थेट कर्ज योजनांतर्गत महामंडळाकडून व्यवसायानुसार 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. यासाठी अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 व वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाखपर्यंत असावी.

नियमित 48 मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज अदा करावे लागते. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनांतर्गत उच्च शिक्षणासाठी राज्य देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करण्यात येतो. देशांतर्गत अभ्यासक्रमाकरिता 10 लाख व परदशी अभ्यासक्रमाकरिता 20 लाखपर्यंत कर्ज देण्यात येते.

राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमाकरिता दिलेल्या कर्जामध्ये शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराचा राहण्याचा व भोजनाचा खच याचा समावेश राहील. इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळावर तसेच सामाजिक न्याय भवन येथील महामंडळाच्या कार्यालयात जिल्हा व्यवस्थापकाशी संपर्क साधावा.

अर्ज करण्यासाठी :- https://www.msobcfdc.org/

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना..

राज्यातील महिला बचतगटाच्या वस्तूंचे उत्पादन व प्राक्रिया यावर आधारीत उद्योगांकरिता बँकेमार्फत मजुर 10 लाखापर्यंतच्या कर्जावरील 12 टक्के व्याजाचा परतावा देण्यात येईल. ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालीत साधन केंद्र (सीएमआरसी) च्या साहाय्याने राबविण्यात येणार आहे.

कौशल्य विकास प्रशिक्षण योजना..

इतर मागासवर्गातील पात्र व्यक्तींना आधुनिक प्रशिक्षणाद्वारे कौशल्यपूर्ण बनविणे व त्याद्वारे त्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाची ही योजना आहे. संपूर्ण प्रशिक्षण महामंडळाद्वारे करून देण्यात येते.

या योजनेकरिता अर्जदार 18 ते 50 वयोगटातील इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.

महामंडळाच्या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना..

बचतगट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत) अशा शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार, उद्योग उभारणीकरिता जे कर्ज दिले जाईल, त्यावरील व्याज परतावा महामंडळाकडून अदा केला जातो. गटाने विहीत वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास जास्तीत जास्त 12 टक्के व्याजदराच्या आणि 15 लाख मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम त्यांच्या खात्यात दरमहा जमा करण्यात येईल. गटातील लाभार्थ्याचे किमान वय 18 ते 45 वर्षे असावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *