शेतीशिवार टीम, 16 सप्टेंबर 2022 :  राज्य सरकारकडून वेळोवेळी लोकहिताच्या विविध योजना सुरू केल्या जात असून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे ध्येय आहे. यासाठीही सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. याचा फायदा राज्यातील नागरिकांना होऊन राज्यही आर्थिकदृष्ट्या प्रगत होण्याचा उद्देश आहे. 

आज या लेखात आपण शरद पवार ग्राम समृद्धी योजनेबद्दल संबंधित सर्व माहिती जाणून घेणार आहोत जसे की, या योजनेची पात्रता, कागदपत्रे, योजनेचा उद्देश, लाभ, वैशिष्ट्ये, अर्ज प्रक्रिया इ. त्यामुळे संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा पूर्ण लेख वाचा….

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2022 :-

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेंतर्गत गावांचा विकास होण्यासोबतच शेतकऱ्यांना प्रगत शेती करता यावी म्हणून त्यांच्या शेतीशी संबंधित कामांमध्ये सुविधा मिळणार आहे. या योजनेचं नाव महाविकास आघाडी सरकारने सुचवले होतं. या योजनेलाही मंत्रालयाने मान्यता दिली असून शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना ही मनरेगाशी जोडली गेली आहे.

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी जोडून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही योजना रोजगार हमी विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि गावांचाही विकास होईल यात शंका नाही.

पहा किती अन् कसा मिळणार निधी…  

कुक्कुट पालन तसेच पोल्ट्री शेड बांधणे :-

100 पक्ष्यांकरिता शेड बांधण्यासाठी 49,760 रुपये अनुदान मिळणार तर 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुपट निधी मिळणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याकडे 100 पेक्षा कमी पक्षी असल्यास त्याने 100 रुपयांचा स्टॅम्प घेऊन दोन जामीनदारांच्या सहीसह अर्ज करता येऊ शकतो. परंतु शेड मंजूर झाल्यानंतर 100 पक्षी असणे बंधनकारक असणार आहे.

शेळ्यासाठी शेड बांधणे :  

10 शेळ्यांचे शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिलं जाणार असून 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांसाठी तिप्पट अनुदानाचा लाभ घेता येईल.

भू-संजीवनी नाडेप कोंपोस्टिंग :- 

शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये अनुदान दिलं जाणार आहे.

गाई आणि म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे :-  

या योजनेअंतर्गत 2 ते 6 गुरांसाठी (गाई / म्हैस) गोठा बांधण्यासाठी 77,188 रुपये इतके अनुदान मिळेल. तर 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2022 चे लाभ :-  

या योजनेंतर्गत खेड्यापाड्यातील व राज्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेतून शेतकरी व ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांची शेती सुधारण्यासाठी उपाययोजना शिकवल्या जातील, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
या योजनेंतर्गत ग्रामीण भागात शेड व गोठा बांधण्यात येणार आहे.
राज्यातील ज्या नागरिकांना पोल्ट्री फार्म सुरू करायचा आहे, त्यांनाही सरकारकडून मदत दिली जाणार आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे फक्त 2 जनावरे पाळली आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेसाठी आवश्यक पात्रता आणि कागदपत्रे :-

या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी.
अर्जदार हा ग्रामीण भागात राहणारा असावा.
शेती करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र मानली जाईल.
अर्जदाराकडे त्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे रेशनकार्डही असायला हवं, तरच तो अर्ज करू शकतो.
या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी व्यक्तीकडे कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
त्याच्याकडे उत्पन्नाचा दाखलाही असणे आवश्यक आहे.
याशिवाय अर्जदाराचा मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि मतदार ओळखपत्रही लागेल.

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2022 साठी अर्ज प्रक्रिया :-

सध्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही, सरकारने अजून ऑनलाईन सेवा उपलब्ध केली नसून तुम्हाला ऑफलाईन अर्ज केला येणार आहे.

तुम्हाला या योजनेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा करावा लागणार आहे. त्या 4 पानांची संपूर्ण PDF तुम्ही या डाउनलोड करू शकता.

आता अर्ज कसा भराल…

प्रथमतः तुम्ही सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांपैकी कोणाकडे अर्ज करताय त्याच्या नावावर बरोबरची खूण करा.

त्यानंतर खाली दिल्याप्रमाणे, ग्रामपंचायत नाव / तालुका, जिल्हयाचं नाव टाकून उजवीकडे तारीख टाकून फोटो चिकटवा.

अर्जदाराचे नाव,
पत्ता,
तालुका,
जिल्हा
मोबाईल क्रमांक टाका.

संपूर्ण डिटेल्स भरा.

येथे मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांची यादी आहे. पण, आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्याने नाडेप कंपोस्टिंग, गाय- म्हैस गोठ्यांचं कॉंक्रिटीकरण, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड यापैकी तुम्हाला ज्या कामासाठी अनुदान हवे आहे त्या कामासमोर बरोबरची खूण करा.

इथे प्रत्येक कामासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.

त्यानंतर तुमचं कुटुंब कोणत्या प्रकारात (cast) मोडतं त्यासमोर बरोबरची खूण करा.

तुम्ही जो प्रकार निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावा जोडा.

लाभार्थींच्या नावे जमीन आहे का, असल्यास “हो’ म्हणून सातबारा, आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडा.

रहिवासी दाखला जोडा तसेच तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का, तेही भरा.

अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षांवरील पुरुष, स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहा.

शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करा.

यासोबत मनरेगाचे जॉब कार्ड, 8-अ, सात-बारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8-अ चा उतारा जोडा.

यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचे एक शिफारसपत्र द्यावे लागणार आहे. यात लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याबाबत सांगितले जाईल.

त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही- शिक्‍क्‍यानुसार पोचपावती दिली जाईल. यात तुम्ही लाभासाठी पात्र आहे की नाही ते नमूद केले जाईल.

एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल ; पण तुमच्याकडे मनरेगाचे जॉब कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला आधी ग्रामपंचायत कार्यालयात जॉब कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

महाराष्ट्र सर्व शेतकरी बंधूंना कळविण्यात येते की, केंद्र सरकार पुरस्कृत मनरेगा अंतर्गत जिल्हा परिषद व ग्रामपंचायत मार्फत शेत रस्ता (रक्कम रु.25 लक्ष/-) आणि गोठा बांधणी करिता (रक्कम रु.70000/-) अनुदान देण्यात येणार आहे. सदर अर्ज ग्रामपंचयतीतर्फे स्वीकारून प.स. मधून झेड.पी. कडे येतील आणि अंतिम मंजूर होतील…

तरी इच्छुक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आप-आपल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन मागणी अर्ज (लेबर बजेट साठी) तात्काळ दाखल करावे काही अडचण आल्यास हेल्पलाईन टोल फ्री :- क्रमांक 1800223839 किंवा आयुक्त रोजगार हमी योजना विभाग महाराष्ट्र राज्य नागपूर :- फोन 07122555501 यांच्याशी संपर्क साधावा…

अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत ग्रामपंचायत कार्यालयाला भेट द्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *