हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे यश आणि भविष्यातील फायदे लक्षात घेऊन राज्य सरकारने आणखी एक सुपर एक्सप्रेस वे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या अंतर्गत नागपूर ते गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्ग (नागपूर – गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्ग) बांधण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्ग बांधकामासंदर्भात आढावा बैठक घेतली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते..

राज्यातील सर्वात लांब एक्सप्रेस – वे..

MSRDC ने या शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट म्हणजे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या अलाइनमेंटनुसार ‘शक्तिपीठ’ मार्ग आता 760Km ऐवजी 805Km किमी लांबीचा असणार आहे. MSRDC ने अलाइनमेंट अंतिम करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे. तर दुसरीकडे या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा (DPR) तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. संरेखन आणि आराखडा शक्य तितक्या लवकर मंजूर करून MSRDC ने प्रयत्न करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

11 जिल्ह्यांतून जाणार हा एक्सप्रेस – वे..

नागपूर आणि गोवा दरम्यान बांधण्यात येत असलेला शक्तीपीठ एक्सप्रेस – वे 3 देवी महालक्ष्मी, तुळजा भवानी आणि पत्रादेवी या शक्तीपीठांना जोडणार असून मार्ग तुळजापूर, माहूर, अंबेजोगाई शक्तीपीठ, कोल्हापूर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, नांदेड साहिब, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गंगापूर आणि औदुंबर या तीर्थक्षेत्रांना जोडला जोडला जाणार आहे. या महामार्गाच्या उभारणीसाठी 86 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे.

या तालुक्याला येणार सोन्याचे दिवस..

यापूर्वी चार राष्ट्रीय महामार्ग गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून आता आणखी एक राष्ट्रीय महामार्ग जाणार असून या महामार्गामुळे मोहोळ तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाची संख्या आता तब्बल पाच झाली आहे. ‘शक्तिपीठ एक्सप्रेस वे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गाच्या संपादित क्षेत्रात मोहोळ तालुक्यातीलही क्षेत्राचा समावेश होत असल्यामुळे मोहोळ तालुक्याची दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी कनेक्टिव्हिटी आता आणखी अधोरेखित होणार आहे.

यापूर्वी मोहोळ तालुक्यातून मुंबई ते हैदराबाद, मोहोळ – पंढरपूर – आळंदी, सोलापूर – सांगली – कोल्हापूर आणि विजापूर असे चार महामार्ग गेले आहेत. 2029 च्या अखेरीस पूर्ण होऊ शकणारा हा महामार्ग राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी तीन शक्तिपीठांना जोडणारा असल्याने याला शक्तीपीठ महामार्ग म्हणून संबोधले जात आहे.

हा महामार्ग एम.एस.आर.डी.सी. कडून पूर्ण होणार असून या महामार्गाच्या पूर्णत्वासाठी सध्याचे सरकार युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे. या महामार्गासाठी मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी, डिकसळ, भोयरे, घाटणे, मोहोळ, पोखरापूर, तांबोळे, सौंदणे, टाकळी सिकंदर यासह अन्य गावातील क्षेत्र संपादित होणार आहे.

याबाबत संपादित होणाऱ्या संभाव्य क्षेत्रांचे गट क्रमांक असलेली यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीच्या संपादनातून मोठी रक्कम मिळेल, अशी आशा वाटत असल्यामुळे सर्वााच लक्ष या महामार्गाचे काम कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे.

दळणवळणात सोलापूर जिल्हा अव्वल..

दळणवळणाच्या सोयी सुविधांच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रात अव्वल ठरत आहे. रेल्वे मार्गांचेही विस्तृत जाळे झाले असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला झपाट्याने चालना मिळत आहे. सप्टेंबर 2022 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प- नागपूर गोवा द्रुतगती मार्गाची घोषणा केली. तर महाराष्ट्र सरकारने 23 -24 या आर्थिक वर्षांसाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने वा ‘ ग्रीन एक्स्प्रेस वे’ला मंजुरी दिली आहे.

12 जिल्ह्यांतून जाणार हा महामार्ग..

तांत्रिक व व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे कामही यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. बारा जिल्ह्यांतून महामार्ग जाणार राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांतून हा महामार्ग जाईल.

पुढे तो गोवा – महाराष्ट्र हद्दीला जोडला जाणार आहे. या प्रकल्पाचा तांत्रिक व वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार करण्याबाबतचे निर्देश राज्य रस्ते विकास महामंडळास यापूर्वीच दिले आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *