मुंबई ट्रान्स – हार्बर सी लिंक (MTHL) हा मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा 21.8 किमी लांबीचा पूल प्रदीर्ध प्रतीक्षेनंतर आता प्रवाशांसाठी खुला झाला आहे. वांद्रे-वरळी सी लिंकच्या यशानंतर, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL), हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे. हा पूल शिवडीपासून सुरू होतो, एलिफंटा बेटाच्या उत्तरेला ठाणे खाडी ओलांडतो आणि न्हावा शेवाजवळील चिर्ले गावात संपतो. हा न्हावा बंदर, मुंबई – पुणे एक्सप्रेसवेला आणि मुंबई – गोवा महामार्गाला थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करतो.
आता या ट्रान्स – हार्बर सी लिंक या अटल सेतूच्या कनेक्टिव्हिटीमुळे मुंबई – पुणे हे अंतर 90 मिनिटांत शक्य व्हावे म्हणून MMRDA ने कंबर कसली आहे. या ट्रान्स हार्बर लिंकमुळे आसपासच्या उपनगरांना थेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आंतरमार्गिकांच्या कामाने वेग पकडला आहे.
आता मुंबई – पुणे ही दोन शहरे आणखी जवळ आणण्यासाठी JNPT बंदर नजीकच्या पोगोटे जंक्शनपासून ते मुंबई – पुणे हायवेवरील चौक जंक्शनपर्यंत 29.15 Km लांबीचा नवा सहापदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या कामावर नॅशनला हायवे ॲथोरिटी सुमारे 3010 कोटी 36 लाख रुपये खर्च करणार आहे.
या ग्रीनफिल्ड लिंकरोडमुळे अनेक रस्त्यांवरील रहदारी कमी होण्याची अपेक्षा आहे, या मुंबई, नवी मुंबई, कर्जत, खोपोली, लोणावळा, पुणे आणि इतर अनेक ठिकाणी जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मदत होणार असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एरपोर्टही पुणे शहराच्या अधिक जवळ येणार आहे.
चिर्ले येथेही 7.35 Km लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर..
हा ट्रान्स – हार्बर सी लिंक सुरु झाल्याने आता मुंबई – गोवा हायवे आणि मुंबई – पुणे एक्सप्रेसवेसह जुन्या मुंबई पुणे हायवेला जोडण्यासाठी चिर्ले येथे सुरु असलेल्या अंतरमार्गिकेच्या कामानेही वेग पकडला आहे.
पहिल्या टप्प्यात JNPT बंदरातून होणाऱ्या अवजड मल्टिएक्सल कंटेनर ट्रकच्या वाहतुकीमुळे हाेणारी वाहतूककोंडी आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकवरील ताण कमी करण्यासाठी चिर्ले टोकापासून ते गव्हाणफाटा आणि पळस्पेफाटा ते मुंबई-पुणे एक्सप्रेस – वेपर्यंत 7.35Km लांबीचा असा एलिव्हेटेड कॉरिडॉर असून त्यावर 1351.73 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
रिअल इस्टेटवर MTHL चा परिणाम..
MTHL धोरणात्मकदृष्ट्या पनवेलजवळ आहे. नवी मुंबई आणि दक्षिण मुंबईच्या भागांसाठी कनेक्टिव्हिटीमध्ये ही मोठी वाढ आहे कारण यामुळे प्रवासाचा वेळ 2.5 तासांवरून 30 मिनिटांपर्यंत कमी होतो. आगामी काळात MTHL मुंबई आणि नवी मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये बदल घडवून आणणार आहे. यामुळे पनवेल, उलवे आणि इतर शेजारच्या सूक्ष्म बाजारपेठांमध्ये मालमत्तेची मागणी वाढणार आहे.
हे महत्त्वाकांक्षी प्रकल्पही 4 पॅकेजमध्ये बांधले जाणार..
पॅकेज 1 – ठाणे खाडी आणि शिवडी इंटरचेंजवर पसरलेला पूल – 10.38 किमी
पॅकेज 2 – ठाणे खाडी आणि शिवाजी नगर इंटरचेंजवरील पुलाचा भाग – 7.8 किमी
पॅकेज 3 – MTHL ला राज्य महामार्ग 52 आणि 54 आणि चिर्ले येथील राष्ट्रीय महामार्ग 4B शी जोडणारे मार्ग आणि इंटरचेंज – 6.3 किमी
पॅकेज 4 – प्रकल्पासाठी इंटीलिजन्ट वाहतूक व्यवस्था (टोल आणि वाहतूक व्यवस्थापन सिस्टीम समाविष्ट आहे) आणि उपकरणे बसवणे.