Take a fresh look at your lifestyle.

NHPC Recruitment 2023: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवरमध्ये 400 पदांची मेगा भरती, पगार 1 लाख 19 हजारांपर्यंत, असा करा ऑनलाईन अर्ज..

0

NHPC भर्ती 2023 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) मध्ये अनेक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार आता या पदांसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, वरिष्ठ लेखापाल, हिंदी अनुवादक अशा 388 पदांचा समावेश आहे, ज्यावर भरती केली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांसाठी 09 जूनपासून ऑनलाइन अर्ज सुरु झाले आहेत. अर्जाची प्रक्रिया 30 जून 2023 पर्यंत चालेल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना NHPC च्या अधिकृत वेबसाइट nhpcindia.com ला भेट द्यावी लागेल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतातील प्रकल्प किंवा पॉवर स्टेशन किंवा कार्यालयांमध्ये नोकरीवर ठेवले जाणार आहे.

NHPC भरती रिक्त जागा डिटेल्स..

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) -149

कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – 74

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 63

कनिष्ठ अभियंता (E&C) – 10

पर्यवेक्षक (IT) – 09

पर्यवेक्षक (सर्वेक्षण) – 19

वरिष्ठ लेखापाल – 28

हिंदी अनुवादक – 14

ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – 14

ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल) – 08

NHPC भरती वयोमर्यादा :-

NHPC भरतीसाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा 30 वर्षे ठेवली आहे. SC, ST, OBC आणि PWD उमेदवारांसाठी वयात सवलत दिली दिली आहे. SC/ST – 5 वर्षे
OBC – 3 वर्षे
PWD – 10 वर्षे
PWBD – OBC – 13 वर्षे
PWBD SC/ST – 15 वर्षे

NHPC भरती वेतन :-

कनिष्ठ अभियंता / पर्यवेक्षक / वरिष्ठ लेखापाल – रु. 29,600 ते रु. 1,19,500

हिंदी अनुवादक – रु. 27,000 ते रु. 1,05,000

ड्राफ्ट्समन – रु. 25,000 ते 85,000

शैक्षणिक पात्रता..

कनिष्ठ अभियंता : उमेदवारांना किमान 60% गुणांसह अभियांत्रिकी पदविका असणे आवश्यक आहे.

पर्यवेक्षक : उमेदवारांनी DOEACC ‘A’ स्तरावरील अभ्यासक्रमासह बॅचलर पदवी आणि संबंधित विषयातील डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ लेखापाल : उमेदवार इंटर सीए पास किंवा इंटर सीएमए पास असावा.

हिंदी अनुवादक : उमेदवारांनी पदवी स्तरावर निवडक विषय म्हणून इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी एक वर्षाचा पदव्युत्तर पात्रता अनुभव किंवा पदवी / डिप्लोमा इंग्रजीतून हिंदीमध्ये अनुवादित केलेला असावा.

ड्राफ्ट्समन : NCVT मधून NTC/NAC आणि मॅट्रिकसह ITI पास.

NHPC Recruitment : असा करा ऑनलाईन अर्ज..

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट nhpcindia.com ला भेट द्या.

Careers Apply Online वर क्लिक करा.

ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून रिजिस्ट्रेशन करा.

यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.

तुमच्या डिटेल्ससह ऑनलाइन अर्ज भरा.

आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.

अर्ज सादर कर..

शेवटी सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.

Leave A Reply

Your email address will not be published.