नगर –
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांनी उमेदवारी करून रंगत आणली आहे.विखे कुटुंबाचे नेहमी वर्चस्व स्थानिक पुढाऱ्यांवर होते.यावेळी देखील विखे यांच्याच इशाऱ्यावर अनेक डमी उमेदवार उभे होते.निलेश लंके यांच्या नावाचे साधर्म्य असणारा निलेश साहेबराव लंके, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी असे वेगळे फॅक्टर ठरणारे उमेदवारांची माघार झाल्याने लंके यांचे पारडे अधिकच जड झाले आहे अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.

विखे आणि लंके यांच्यात असणारी लढत घासून होईल अशी शक्यता होती.इतर पक्षाचे आणि मतांचे ध्रुवीकरण होणारे पत्ते विखेंनी टाकले होते.या डावपेचात निलेश लंके यांनी अक्षरशः विखे यंत्रणेला कात्रजचा घाट दाखवला आहे.विखेंनी टाकलेला प्रत्येक डाव त्यांच्यावर उलटला असून निवडणूक सुरू होण्याआधीच लंकेचे गणित जुळताना दिसते आहे. धनशक्ती विरोधी जनशक्ती असणारी ही लढाई निर्णायक टप्प्यावर गेली आहे.

सुजय विखे पाटील यांच्यावर स्व पक्षाअंतर्गत असणारी नाराजी मोठी आहे.मोदींच्या नावावर मते मागितले तरी लोक निलेश लंके हे देखील कट्टर देशभक्त आहे या उलट विखे यांनी भाजपाला नेहमी अपशब्द वापरले होते.मोदी देशात पण जिल्हात काम करणारा आणि जनतेला उपलब्ध असणारा सेवा करणारा खासदार हवा आहे अशी जनभावना उफाळून आल्याने विखे यांची नामुष्की झाली आहे.आर्थिक रसद टाकून पेरलेले डाव यशस्वी करण्यासाठी विखे परीवार पहाटे पर्यंत झगडत होता मात्र निलेश लंके यांनी काटशाह देऊन विखे यांना कुस्ती सुरू होण्या आधीच डाव टाकून आसमान दाखवले आहे.

चौकट –
आपली यंत्रणा जिल्ह्यात सर्वाधिक सक्षम आहे असे वातावरण करून विखे यांनी नेहमी राजकारण साधले आहे.विखे यंत्रणेचा हा बागुलबुवा लंके व त्यांच्या मदतीला असणाऱ्या जनशक्तीने असा काही फोडला आहे की विखे गोटात कमालीची अस्वस्थता पसरली असून भाजपा कार्यकर्ते आनंदाने कोणी तरी जिरवणारा भेटला अशी चर्चा करताना दिसून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *