शेतीशिवार टीम : 17 ऑगस्ट 2022 :- भारतीय जनता पक्षाने नवीन संसदीय मंडळाची घोषणा केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्येष्ठ नेते रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि शिवराजसिंह चौहान यांना मंडळात स्थान मिळालेलं नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून नितीन गडकरींच्या मोठा धक्का बसला आहे. तर बीएस येडियुरप्पा, व्हीबीएल संतोष यांना संसदीय मंडळात प्रवेश मिळाला आहे.

संसदीय मंडळात या नेत्यांना मिळालं स्थान :-

जेपी नड्डा (अध्यक्ष), नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा, बीएस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, बीएल संतोष (सचिव)

याशिवाय केंद्रीय निवडणूक समितीही स्थापन करण्यात आली आहे. त्यात 15 सदस्यांचा समावेश आहे. केंद्रीय संसदीय समितीप्रमाणेच जेपी नड्डा यांना निवडणूक समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे.

निवडणूक समितीत या नेत्यांना मिळालं स्थान :-

जेपी नड्डा, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बीएस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथूर, बीएल संतोष, वनाथी श्रीनिवास

गडकरी बाहेरचा रस्ता तर फडणवीसांची एंट्री, नेमकं काय आहे समीकरण ?

भाजपने केलेल्या या बदलातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे नितीन गडकरी यांची संसदीय मंडळातून हकालपट्टी. मोदी सरकारच्या दोन्ही कार्यकाळात गडकरीअतिशय लोकप्रिय मंत्री राहिले आहेत. त्यांच्या रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या कामाची बरीच चर्चा झाली आहे. शिवाय, संसदीय मंडळात पक्षाच्या माजी अध्यक्षांना कायम ठेवण्याची परंपरा आहे, जी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या हकालपट्टीनंतरच संपली.

मात्र नितीन गडकरींसारख्या सक्रिय आणि तगड्या नेत्याला येथून हटवणे धक्कादायक आहे. मात्र, समतोल साधत भाजपने नितीन गडकरींच्या जागी देवेंद्र फडणवीस यांची बढती करून त्यांचा केंद्रीय निवडणूक समितीत समावेश केला आहे.

शिवराजांच्या जागी जातियाला मिळाली एन्ट्री, काय आहे भाजपचा प्लॅन

याशिवाय शिवराज सिंह चौहान यांचीही दीर्घकाळानंतर संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पक्षाने संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीवर सत्यनारायण जातिया यांचा समावेश केला आहे. नव्याने स्थापन झालेल्या निवडणूक समिती आणि भाजपच्या संसदीय मंडळातही राज्य आणि जाती यांच्यातील समतोल पाहायला मिळतो.

भाजपने पहिल्यांदाच इकबाल सिंग लालपुरा यांच्या रूपाने एका शीख नेत्याचा संसदीय मंडळात समावेश केला आहे. याशिवाय ओबीसी नेता म्हणून हरियाणाच्या सुधा यादव यांना संधी देण्यात आली आहे. तर तेलंगणाचे के. लक्ष्मण आणि कर्नाटकचे बीएस येडियुरप्पा यांनाही दक्षिण विस्ताराच्या योजनेचे संकेत देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *