शेतीशिवार टीम : 13 जुलै 2022 :- नियमिपणे आपल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान 2020 – 2021 – 2022 या तिन्ही वर्षाच्या बजेटमध्ये करण्यात आलेली घोषणा 2022 च्या बजेटमध्ये यासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद…. 

हे सर्व झालेलं असताना मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असताना फक्त एक शासन निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदानापासून वंचित ठेवलं गेलं.

गेल्या 3 वर्षापासून शेतकरी या घोषणेच्या आणि या मिळणाऱ्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. असं असताना आता सरकार बदल झाला शासनाने जीआर न काढल्यामुळे हे 50 हजार रुपये अनुदान मिळेल की नाही ? अशी शक्यता निर्माण झाली होती, शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात संभ्रमात गेले होते. आणि नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्यावर अन्याय होतोय, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. त्यासाठी शेतकऱ्यांमधून खूप मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला होता. या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी स्वतः शेतकरी प्रयत्न करत होते.

याच पार्श्वभूमीवर आता सांगलीचे खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन लाखो शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्जमाफी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने लावलेले नियम जाचक आहेत.

2018-19 मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. याशिवाय या योजनेत 2017-18, 2018-19, 2019-20 या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे . या निकषात राष्ट्रीयीकृत बँका आणि जिल्हा बँका यांचे आर्थिक वर्ष वेगवेगळे असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही, असे म्हटले आहे.

या निवेदनाच्या अनुषंगाने आता याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल घेत, या निवेदनाच्या अनुषंगाने जाचक अटी रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच ताबडतोब यंत्रणांना निर्देश देऊन अध्यादेश काढण्यासाठी सूचना देण्यात आल्या बद्दलची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

त्यामुळे लवकरच याबाबत JR काढून नियमित कर्जफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हा अनुदान मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

या शेतकऱ्यांना मिळाला सुखद धक्का :-

नियमित पाने कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी जाचक अट अशी होती की, या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार परंतु अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मूळ्नार नव्हती…

आता या निर्णयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमूलाग्र असा बदल करून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हे प्रोत्साहनपर तर दिले जाणार असून आता अशा ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले तर ते देखील भरपाईसाठी देखील पात्र राहणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *