शेतीशिवार टीम,11 डिसेंबर 2021:- लोक विशेषत: WhatsApp चा युज मॅसेज, कॉल, फोटो यांसाठी केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की, आता तुम्ही तुमचे WhatsApp मॅसेज बाय डीफॉल्ट गायब करू शकता ? होय, व्हॉट्सअप युजर्स हे व्हॉट्सअप डिसपिअरिंग मॅसेज फीचरद्वारे डिलीट करू शकतात. हे मेसेजिंग ऍप्लिकेशनद्वारे प्रदान केलेले एक ऑप्शन WhatsApp फीचर्स आहे जे तुम्ही अधिक गोपनीयतेसाठी चालू करू शकता.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तुम्ही गायब होणारे फीचर्स इनेबल करता, तेव्हा तुम्ही चॅट पाठवल्यानंतर 24-तास, 7-दिवस किंवा 90-दिवसांच्या कालावधीसाठी डिलीट होण्यासाठी सेट करू शकता.
जर युजर्सने 24 तास, 7 दिवस किंवा 90 दिवसांच्या कालावधीत व्हॉट्सअप उघडले नाही, तर चॅटमधून मॅसेज गायब होईल. परंतु, व्हॉट्सअॅप उघडेपर्यंत मॅसेज चा प्रिव्हिव्ह नोटिफिकेशनमध्ये दिसू शकतो.
अँड्रॉइड (Android) आणि (IPhone) आयफोनवर गायब होणारे फीचर्स कसे इनेबल कराल ?
1. WhatsApp चॅट उघडा.
2. Contact नावावर टॅप करा.
3. Disappearing message वर टॅप करा. प्रॉम्प्ट (Prompt) दिल्यास , सुरू ठेवा वर टॅप करा.
4. 24 तास, 7 दिवस किंवा 90 दिवस सिलेक्ट करा.