शेतीशिवार टीम, 23 डिसेंबर 2021 : देशातील कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा (Omicron) वेग वाढला आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे नवीन रुग्ण आढळल्यानंतर एकूण संक्रमित लोकांची संख्या 300 च्या पुढे गेली आहे. परंतु आज राज्यात ओमिक्रॉनचा (Omicron) विस्फोट झाला असून गुरुवारी 23 नवे रुग्ण आढळल्यानंतर, राज्यातील नव्या रुग्णांची संख्या 88 वर पोहोचली आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजारी असतानाही आज 10 वाजता कोविड टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. लवकरचं महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे असे संकेत आज अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही देले आहे.
तसेच आज थोड्यावेळापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुढील आदेशापर्यंत रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे.
आज महाराष्ट्रात आढळलेल्या नव्या रुग्णांपैकी पुण्यात 13 रुग्ण आढळले आहेत, तर मुंबईत 5, उस्मानाबाद, ठाणे, नागपूर आणि मीरा-भाईंदरमध्ये 2 रुग्णांची पुष्टी झाली आहे.
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री 10 वाजता महत्त्वाची बैठक बोलावली आहे. टास्क फोर्ससोबत ही बैठक रात्री 10 वाजता होणार असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाकडून सांगण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारही निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गुजरातमध्येही ओमिक्रॉनचे 9 नवे रुग्ण :-
गुरुवारी गुजरातमध्ये ओमिक्रॉनचे 9 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर, एकूण संक्रमितांची संख्या 23 झाली आहे. त्यापैकी 19 अजूनही अँक्टिव्ह आहेत.
कर्नाटकात ओमिक्रॉनचे 12 नवे रुग्ण :-
कर्नाटकमध्ये आज 12 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, त्यानंतर या व्हेरियंटची एकूण संख्या 31 झाली. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर म्हणाले की, संसर्ग झालेल्यांमध्ये 9 आणि 11 वर्षांच्या दोन मुलींसह 7 महिलांचा समावेश आहे. सुधाकर म्हणाले, आज कर्नाटकात ओमिक्रॉनच्या संसर्गाच्या 12 नवीन प्रकरणांची पुष्टी झाली आहे, ज्यामुळे एकूण प्रकरणांची संख्या 31 झाली आहे.