शेतीशिवार टीम, 11 फेब्रुवारी 2022 : UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.
खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये खूप मदत करू शकतात.
प्रश्न – ताजमहाल मुमताजच्या मृत्यूपूर्वी बांधला होता की नंतर ?
उत्तर – मुमताज महल यांचं निधन बुरहानपुर येथे 17 जून 1631 साली मुलगी गौहरा बेगमला जन्म देताना झालं. त्यानंतर शाहजहानने मुमताज महलच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला जो 1653 मध्ये पूर्ण झाला. ताजमहाल बनवायला 22 वर्षे लागले.
प्रश्न – अक्षय ऊर्जेचे (Renewable energy) भविष्य काय आहे ?
उत्तर – खूप सकारात्मक. आम्ही ऑटोमोबाईल्समध्ये अक्षय ऊर्जेला (Renewable energy) प्रोत्साहन देणार आहोत. अशी जागतिक पातळीवर पंतप्रधान मोदी चर्चा करत आहे.
प्रश्न – अशी कोणती गोष्ट आहे जी खाण्यापूर्वी दिसत नाही ?
उत्तर – ठोकर
प्रश्न – असे काय आहे की, जे जितकं जास्त काम कराल तितकं ते वाढतं ?
उत्तर – बुद्धी (Intelligence)
प्रश्न – अशी कोणती गोष्ट आहे जिला डोकं आहे व शेपूट देखील आहे परंतु शरीर नाही ?
उत्तर – नाणं (Coin) नाण्याला हेड असतं, टेल असतं परंतु बॉडी नसते.
प्रश्न – अशी कोणती गोष्ट आहे जी कापल्यानंतर लोकं आनंद साजरा करतात ?
उत्तर – केक (Cake)
प्रश्न – भारतात ऑटोमोबाईल क्षेत्राची अवस्था इतकी वाईट का आहे ?
उत्तर – भारतात, ऑटोमोबाईल उद्योगाचे लीडर म्हणतात त्याप्रमाणे, भारतात कर आकारणी (Taxation) खूप जास्त आहे आणि येथील लोकांना कमी डिस्पोजेबल उत्पन्न (Disposable Income) मिळत आहे. सप्लाई डिमांडला जुळवून घेणं भाताला जड जात आहे. म्हणून ऑटोमोबाईल क्षेत्र संकटात आहे.
प्रश्न – भूगोल आणि भू-विज्ञान यात काय फरक आहे ?
उत्तर – भूगोल ही एक व्यापक संकल्पना आहे ज्या अंतर्गत पृथ्वीचे संपूर्ण क्षेत्रफळ, नैसर्गिक विभागणी, आकाशीय पिंड, जीव – जंतू, प्राणी, वनस्पती इत्यादींचा अभ्यास केला जातो, तर भूविज्ञान ही भूगोलाची एक शाखा आहे ज्यामध्ये पृथ्वीची रचना आणि संघटना इ. अभ्यास केला जातो.