शेतीशिवार टीम, 3 जानेवारी 2022 : कोरोना पाठोपाठ ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण पुणे आणि मुंबई या दोन शहरांत झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे.तसेच शाळांमधील कोरोनाचा वाढत संसंर्ग पाहता आता मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरपालिका हद्दीतील 10 वी व 12 वीचे वर्ग वगळता इतर सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष बंद ठेऊन ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहे.

येत्या 31 जानेवारीपर्यंत पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला गेला असून आता ऑनलाइन पद्धतीने क्लास घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सद्यस्थितीत देशामध्ये व बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ओमायक्रॉनया कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार वाढत असल्याने मुंबईची एकूण लोकसंख्या आणि या शहरात जगभरातून लोकांचे येणे जाणे सुरू आहे.

त्यामुळे या नव्या व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा दि. 04 जानेवारी 2022 ते 31.01.2022 पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येत आहेत.

इयत्ता 1 ली ते इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वी या वर्गातील विद्याथ्याने प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरू राहणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळेतील 15 ते 18 वर्ष वयोगट असलेल्या विद्यार्थ्याचे नियोजनानुसार, लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण सुरु राहणार आहे.

याकरीता महापालिका शाळांसह अन्य खाजगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणाऱ्या 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्याचे लसीकरण करून घेण्यासाठी शाळेत बोलवता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *