शेतीशिवार टीम, 3 जानेवारी 2022 : शेअर मार्केटसाठी 2021 या वर्ष्यात अतिशय चढ-उतारचं प्रमाण खूप होतं .कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम शेअर मार्केटवरही दिसून आला. मात्र, या कठीण काळातही काही स्टाॅक्सने गुंतवणूकदारांना मालामाल केलं .असाच एक शेअर म्हणजे Xpro India. ज्याची किंमत फक्त 21.15 रुपये होती. याद्वारे गुंतवणूकदारांनी अवघ्या 15 महिन्यांत मालामाल केलं आहे.
NSE मध्ये Xpro India च्या शेअरची किंमत 1 ऑक्टोबर 2020 रोजी 21.15 रुपये होती. जे 31 डिसेंबर 2021 रोजी म्हणजेच वर्षाच्या आखिर दिवशी 941.50 वर ट्रेंड करत होते. म्हणजेच 15 महिन्यांत किमतीत 44 पटीने वाढ झाली.
जर आपण मागील महिन्याबद्दल बोललो तर कंपनीच्या एका शेअरची किंमत 897 रुपयांवरून 941.50 रुपयांवर गेली आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअरचा रेट 175 रुपयांवरून 941.50 रुपयांवर गेला.या दरम्यान, शेअरच्या किमतीत 450% ची वाढ झाली होती. जर आपण 1 ऑक्टोबर 2021 च्या तारखेपासून नजर टाकली तर, Xpro इंडियाच्या स्टॉकच्या किमतीत 4,350% वाढ झाली आहे.
एक लाखांचे झाले 44.50 लाख :-
जर एखाद्या व्यक्तीने एक महिना आधी Xpro India मध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर 31 डिसेंबर 2021 पर्यंत ते 1.05 लाखांपर्यंत वाढले असते.
6 महिन्यांपूर्वी, ज्याने या कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असेल, तर 2021 च्या अखेरीस त्याचा परतावा 5.50 लाख रुपये असता.
जर 1 ऑक्टोबर 2020 रोजी, एखाद्या गुंतवणूकदाराने Xpro India च्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर 31 डिसेंबर 2021 पर्यंत ते 44.50 लाख रुपये झाले असते.